अकोला दिव्य न्यूज : पौगंडावस्थेतील युवक, विद्यार्थ्याचे मन अत्यंत संवेदनशील असते. काही विध्यार्थी तर अति संवेदनशील असते. एखादी चुकीची बाब त्यांना असह्य ठरते.बुलढाणा जिल्ह्यातील एका दुर्दैवी आणि तितक्याच खळबळजनक घटनेत याचा प्रत्यय आला. शिक्षकाची अश्लील शिवीगाळ सहन झाली नसल्याने एका भावनाशील विद्यार्थ्याने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली. यामुळे सुसंस्कृत बुलढाणा जिल्हा आणि उच्च शैक्षणिक परंपरा असलेले जिल्ह्याचे शैक्षणिक वर्तुळ अक्षरशः हादरले आहे.

नांदुरा तालुक्यातील वसाडी येथील १० वी मध्ये शिकत असलेल्या मुलाने शिक्षकाच्या शाब्दिक व अनुषंगिक जाचाला कंटाळून आत्महत्या केली. परिवाराने स्वतःच्या शेतात बाधलेल्या नवीन घरातील लोखंडी एगंलला दोरीच्या साह्याने गळफास लावून घेत त्याने आपली जीवनयात्रा संपविली आहे. काल मंगळवारी, १ जुलै रोजी रात्री उशिरा हा दुदैवी घटनाक्रम घडला.
विनायक महादेव राऊत (वय १५ वर्षे, राहणार वसाडी, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा ) असे आत्मघात करून घेणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे.मृतक विनायक याच्या खिशात सापडलेल्या ‘सुसाईड नोट’ मध्ये वर्ग शिक्षक सुर्यवंशींनी आईवडीलांबाबत उच्चारलेल्या अपशब्द अर्थात शिवीगाळने अपमानित केल्याने मी आत्महत्या करीत असल्याचे नमुद आहे. या घटनेमुळे राऊत परिवार व गावकऱ्यांना धक्का बसला आहे. या प्रकरणी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.पोलिसांनी आरोपी शिक्षक सुर्यवंशी याला ताब्यात घेतले. ह्या शिक्षकाने दोन तिन वेळा शिक्षकांना न शोभणारी गैर वर्तणूक केली होती अशी चर्चा आहे. गावकऱ्यांनी याबाबत शिक्षण संस्था पदाधिकाऱ्यांकडे कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र शिक्षण संस्थेने काही दिवस वादग्रस्त शिक्षकाची बदली केली. मात्र पुन्हा वसाडी येथील शाळेवर रुजू करून घेतले. जर वेळीच ह्या शिक्षका वर योग्य कारवाई झाली असती तर आज रोजी वर्गात हुशार व चांगल्या विद्यार्थ्यांचा बळी गेला नसता, अशी संतप्त प्रतिक्रिया नातेवाईक व गावकऱ्यांमध्ये उमटली आहे . या प्रकरणी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्या मध्ये आकस्मिक मृत्यू अंतर्गत मर्ग दाखल झाला आहे. विनायकच्या मृतदेहाचे खामगाव येथील उप जिल्हा सामान्य रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले.