अकोला दिव्य न्यूज : सामाजिक कार्य करतांना तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवणे आवश्यक आहे. सध्याच्या वाढत्या कौटुंबिक समस्या चिंतनीय आहे, त्यासाठी उत्तम संस्काराची गरज आहे, परिणामी वाढत्या सामाजिक समस्या सोडविण्यासाठी रोटरी क्लबने पुढाकार घेणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन प्रमुख अतिथी डॉ .के. के. अग्रवाल यांनी यांनी रोटरी क्लब ऑफ अकोला नॉर्थच्या पदग्रहण सोहळ्या प्रसंगी व्यक्त केले.

यावेळी मंचावर डॉ के.के. अग्रवाल, सहाय्यक प्रांतपाल प्रकाश सारडा, मावळते अध्यक्ष प्रा. प्रविण ढोणे, सचिव डॉ. मेघना गांधी, सचिव नंदकिशोर पाथ्रीकर आणि नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. श्रध्दा अग्रवाल, सचिव प्रशासन प्रा. महेश बाहेती, सचिव प्रकल्प स्नेहल दोशी उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. गणेशवंदना व स्वागत गीत प्रा. देवेंद्र देशमुख यांनी गाईले. सुविचार प्रेसिडेंट इलेक्ट मंजुषा कौसल यांनी सांगितला. प्रमुख अतिथी डॉ. के. के. अग्रवाल व सहाय्यक प्रांतपाल प्रकाश सारडा यांचा पुष्पगुच्छ देऊन डॉ. सुरेश तारे व विजय कौसल यांनी स्वागत केले.तर त्यांचा प्रा. प्रवीण ढोणे व श्रध्दा अग्रवाल यांनी भेटवस्तू देऊन सत्कार केला.
यावेळी अध्यक्ष प्रा. प्रवीण ढोणे यांनी मनोगत तर सचिव डॉ. मेघना गांधी यांनी अहवाल वाचन केले. प्रमुख अतिथी डॉ. अग्रवाल व सारडा यांच्या उपस्थितीत अध्यक्ष म्हणून डॉ. श्रध्दा अग्रवाल व सचिव प्रशासन म्हणून प्रा. महेश बाहेती व सचिव प्रकल्प म्हणून स्नेहल दोशी यांनी पदग्रहण केले.

यावेळी आयपीपी प्रा.प्रवीण ढोणे, प्रेसिडेंट इलेक्ट म्हणून मंजुषा कौसल, उपाध्यक्ष अखिलेश पारिका, कोषाध्यक्ष डॉ. गजानन वाघोडे, सहकोषाध्यक्ष ममता खेतान, सहसचिव रवी खेतकर, सार्जंट आर्म नरेश अग्रवाल, क्लब लर्नर फॅलीसीटेटर म्हणून देवेंद्र वाकचवरे क्लब यंग लीडर कॉन्टॅक्ट डॉ. मयूर अग्रवाल, संचालक म्हणून डॉ. जुगल चिराणीया, मुरलीधर कौसल, डॉ. शिल्पा चिराणीया, डॉ मेघना गांधी, विजयानंद मुळतकर, राजेश खंडेलवाल, नंदकिशोर पाथ्रीकर, डॉ रविंद्र भास्कर, डॉ महेंद्र खंडेडिया, सत्लागार म्हणून डॉ. सुरेश तारे, विजय कौसल, डॉ. तुषार वोरा , दीपक चांडक, दीपक गोयनका यांनी सुद्धा कार्यभार स्विकारला आहे.
नवनियुक्त अध्यक्ष डॉ श्रद्धा अग्रवाल यांचा परिचय शिवांश अग्रवाल याने करून दिला. समाज उपयोगी उपक्रम वर्षभर राबवून समाजऋण फेडण्याचा प्रयत्न करणार आहे. असे अध्यक्ष डॉ श्रध्दा अग्रवाल यांनी सांगितले. प्रकाश सारडा यांनी डिस्ट्रीक्ट गर्व्हनर नाना शेवाळे यांच्या संदेशाचे वाचन केले. प्रमुख अतिथी डॉ. अग्रवाल यांचा परिचय डॉ. जुगल चिराणीया यांनी दिला.
यावेळी अकोल्यातील विविध रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे तसेच नवीन सदस्य ॲड.अनुप देशमुख, गोपाल अग्रवाल, मृणाली अग्रवाल, डॉ. निराली अग्रवाल, ॲड. प्रशांत वराडे, राहुल डोंगरे, ॲड .रवी शर्मा, संजय मालविया, डॉ. शकून सराफ, शशीरेखा पारिका, शौनक वकरे, डॉ. उदय लढ्ढा विनोद टोरका, अमीत अग्रवाल, अंकीता अग्रवाल, अमोल गुप्ता. नेहा गुप्ता, सुरज झुनझुनवाला, ऐश्वर्या झुनझुनवाला, डॉ. प्रतीक लढ्ढा, डॉ. सोनम लढ्ढा ,संजय गोडा, संजना गोडा, राशी पोपट, सतिश रत्नपारखी यांना रोटरी पीन व प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात आले.
नवीन सदस्यांचा परिचय रवी खेतकर यांनी दिला. पुढील प्रकल्पाची माहिती सचिव (प्रशासन) महेश बाहेती यांनी दिली. संचालन देवेंद्र वाकचवरे व ममता खेतान यांनी केले. आभारप्रदर्शन सचिव (प्रकल्प) स्नेहल दोशी यांनी केले. राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता झाली.
यावेळी डॉ शारदा सलामपुरीया, रोटरीयन अर्चना ढोणे, प्रा. देवेंद्र देशमुख, गोविंद खेतान, डॉ. प्रमोद चिराणीया मनोहर विरवानी, अँड.सौ रवी शर्मा प्रेमकुमार चांडक, सुनिल घोडके, अनिल अग्रवाल, नेहरु तारापुरवाला, श्रीकांत पडगिलवार, सुनिल साधवानी, हेमंत कटारिया, डॉ अनंत हेडा, डॉ सत्यनारायण बाहेती, आशिष पवित्रकार, डॉ. कल्याणी पवित्रकार, उमा बाजोरीया, जया बाहेत, विजय पनपालिया, रतनीदेवी अग्रवाल, डॉ. रेखा अग्रवाल, डॉ. कमल लढ्ढा आदींसह अकोल्यातील विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी व डिस्ट्रीक्टचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.