Friday, September 5, 2025
HomeUncategorizedअकोल्याच्या संगणक अभियंता तरूणीवर पुण्यात बलात्कार ! कुरिअरवाला असल्याची बातवणी केली

अकोल्याच्या संगणक अभियंता तरूणीवर पुण्यात बलात्कार ! कुरिअरवाला असल्याची बातवणी केली

अकोला दिव्य न्यूज : एका उच्चभ्रु सोसायटीतील सदनिकेत राहणाऱ्या अकोला येथील तरुणीवर कुरिअर कंपनीतील कामगार असल्याची बतावणी करुन सदनिकेत शिरलेल्या एकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आले असून, पसार झालेल्या आरोपीचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे पिडीत मुलीच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.

पुणे जिल्ह्यातील कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका २५ वर्षीय संगणक अभियंता असलेल्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मुळची अकोला येथील राहणारी असून पुणे येथील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहे. कोंढव्यातील एका उच्चभ्रु सोसायटीत तरुणी तिचा भाऊ राहायला आहेत. तिचा भाऊ परगावी गेला होता.

तरुणी एकटीच सदनिकेत असताना आरोपी सदनिकेजवळ आला. त्याने दरवाजा वाजविला. तरुणीने सदनिकेचा दरवाजा (सेफ्टी डोअर) उघडले. तेव्हा त्याने कुरिअर कंपनीतील कामगार असल्याची बातवणी केली. तरुणीने त्याला कुरिअर माझे नसल्याचे सांगितले. तेव्हा त्याने कुरिअर कागदपत्रांवर स्वाक्षरी करावी लागेल, असे तिला सांगितले. तरुणीला बोलण्यात गुंतवून आरोपीने तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. स्प्रे मारल्यानंतर तिची डोळे जळजळले. त्यानंतर आरोपी तरुण सदनिकेत शिरला.

त्याने तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. पसार झालेल्या आरोपीने मोबाइलमध्ये छायाचित्र काढले आहे. मी परत येईल, असा संदेश मोबाइलमध्ये लिहिला आहे, असे पीडित तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. घाबरलेल्या तरुणीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, कोढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात घबराट उडाली आहे. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलिसांना आरोपीचे वर्णन दिले आहे. त्याआधारे पसार झालेल्या चोरट्याचा माग काढण्यात येत आहे.त्याआधारे पसार झालेल्या चोरट्याचा माग काढण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!