अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्रातील माहेश्वरी समाजातील तरुणांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी युवा संगठनेतर्फ बुलढाणा जिला माहेश्वरी युवा संगठन आणि खामगांव तहसील माहेश्वरी युवा संगठन यांच्या संयुक्त आतिथ्यात आयोजित राज्यपातळीवरील दोन दिवसीय सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवात महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यातून निवडण्यात आलेल्या स्पर्धकांनी एकल नृत्य, समूह नृत्य, शास्त्रीय नृत्य, गायन, कविता पाठ, वादन आणि स्टॅंडअप कॉमेडी सोबतच विविध सांस्कृतिक स्पर्धा तसेच बॅडमिंटन, बुध्दीबळ, रनिंग, स्विमिंग, पुरुष व महिलांचं टर्फ क्रिकेट यासोबतच विविध क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करत मनसोक्त आनंद लुटला.

महोत्सवाचा शुभारंभ भगवान उमा महेश यांच्या प्रतिमेचे पुजन करून वरिष्ठ महिला मंडळ खामगांव आणि बहु-बेटी मंडळाद्वारे महेश वंदना व स्वागत गीत प्रस्तुत करून करण्यात आले. यावेळी हनुमान चालीसा पठन आणि होमहवन करण्यात आले.
उद्घाटन सोहळ्यात कृष्णा मुंदडा, राधेश्याम चांडक (संस्थापक, बुलडाणा अर्बन), श्यामसुंदर सोनी (संस्थापक अध्यक्ष, प्रदेश युवा संगठन), आ.चैनसुख संचेती, मिसेस यूनिवर्स इंडिया रूपल मोहता, शरद सोनी (राष्ट्रीय अध्यक्ष, अ.भा.मा.यु.स.), सीए दामोदर सारडा (अध्यक्ष, विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संगठन), अनिरुद्ध काकानी (राष्ट्रीय सांस्कृतिक मंत्री), हिमांशु चांडक (उपाध्यक्ष, मध्यांचल), मनीष चांडक (संयुक्त मंत्री, मध्यांचल), सागर लोहिया (अध्यक्ष, प्रदेश युवा संगठन), दीपांशू भैया (सांस्कृतिक मंत्री), महेश बजाज (क्रीडा मंत्री), प्रसन्ना मुंदडा (महोत्सव संयोजक), पूजा मानधने (संयोजिका), संजय सातल (अध्यक्ष, बुलढाणा जिला सभा), सुनीता भैया (अध्यक्ष, जिला महिला संगठन), कन्हैया बंग (अध्यक्ष, जिला युवा संगठन), राजेश भट्टड, अनिल चांडक व नीता चांडक (अध्यक्ष, खामगांव तहसील संगठन) उपस्थिति होते.
यावेळी पूर्व प्रदेश अध्यक्ष व सचिव आणि पूर्व राष्ट्रीय पदाधिकारी तसेच आयोजनासाठी विशेष सहकार्य करणाऱ्या समाजसेवकांचा स्वागत-सत्कार करण्यात आले. या अनुषंगाने वरिष्ठ मार्गदर्शक विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी युवा संगठनेचे संस्थापक अध्यक्ष आणि महासभेचे मावळते सभापती श्यामसुंदर सोनी, सहकार महर्षी बुलडाणा अर्बन परिवार के संस्थापक राधेश्याम चांडक (भाईजी) यांना अमृत जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. याप्रसंगी राधेश्याम चांडक, श्यामसुंदर सोनी,आ.चैनसुख संचेती, राष्ट्रीय अध्यक्ष शरद सोनी, प्रदेश संगठन अध्यक्ष सीए दामोदर सारडा यांनी मार्गदर्शनपर उद्बोधन केले.
दुसऱ्या दिवशी योग शिक्षक चिराग पनपालिया यांचे जिमनॅस्टिक योग शिबिर घेण्यात आले. त्यानंतर पिरॅमिड ध्यान साधना प्रशिक्षक प्रा.देवयानी नवगजे यांचे ध्यान साधना शिबिर आकर्षणाचे केंद्र ठरले.

कार्यक्रमाच्या समापन सोहळ्यात संजय मुंदडा, महाराष्ट्र केमिस्ट एंड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर, प्रदेश संगठनचे सारथी अभियानाचे संयोजक प्रा.डॉ. रमण हेडा, वाशिम तहसील माहेश्वरी युवा संगठन अध्यक्ष ललित राठी, कवी सतीश लखोटीया, बॉक्सिंग चॅम्पियन हरिवंश टावरी, प्रदेश संगठन महेश नवमी संयोजक गोपाल मालपाणी, राष्ट्रीय युवा संगठन पूर्व पदाधिकारी विवेक मोहता, प्रदेश युवा संगठन के सचिव अमोल बजाज, कोषाध्यक्ष अनुज मुंदडा, बुलढाणा जिला माहेश्वरी युवा संगठन सचिव अंशुल राठी, खामगाव माहेश्वरी युवा मंडळ अध्यक्ष आकाश कलंत्री, तहसील माहेश्वरी संगठन सचिव नटवर राठी, तहसील युवा संगठन सचिव यश बिन्नानी, तहसील महिला संगठन सचिव संध्या भैया प्रामुख्याने उपस्थिती होती. स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तीपत्र व विजेता ट्रॉफी प्रदान करण्यात आली. स्पर्धेकांनी उत्कृष्ट प्रदर्शन, आणि नैतिक मूल्यांनी आपल्या प्रतिभेचा परिचय दिला. सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवानंतर आयोजीत रंगारंग संगीत संध्या मध्ये सर्व स्पर्धक व अभिभावकांनी उस्फुर्त सहभाग घेतला.
आयोजनाचा यशस्वीतेसाठी खामगांव व बुलढाणा येथील माहेश्वरी समाजातील सर्व संघटनांचे सहकार्य उल्लेखनीय होते. भोजन व्यवस्थापनात युवा संगठनेचे पूर्व प्रदेश अध्यक्ष डॉ.विजय टावरी आणि समस्त महेश सेवा परिवार, खामगांव यांनी विशेष सहकार्य केले.
संपूर्ण आयोजनाचे प्रमुख प्रभारी दीपांशु भैया, संयोजक प्रसन्ना मुंदडा व पूजा मानधने यांनी यशस्वीपणे साकार केले.तर संपूर्ण दोन दिवस प्रदेश पदाधिकारी, जिल्हा व स्थानीय संगठनचे अध्यक्ष, सचिव व राष्ट्रीय कार्यकारी मंडळ, प्रदेश कार्यसमिती, कार्यकारी मंडळ सदस्याचा सक्रिय सहभाग होता. मंच संचालन खुशबू चांडक (चंद्रपुर), रोशनी मुंदडा (धामणगांव) व.पुजा मानधने (नागपूर) यांनी यशस्वीपणे पार पाडले.प्रदेश सचिव अमोल बजाज यांनी आभार व्यक्त केले.