Saturday, July 5, 2025
HomeUncategorizedअकोल्यातील 'त्या' तरुणीच्या बलात्कार प्रकरणाला कलाटणी ! 44 रहिवाशांचे जबाब नोंदवले

अकोल्यातील ‘त्या’ तरुणीच्या बलात्कार प्रकरणाला कलाटणी ! 44 रहिवाशांचे जबाब नोंदवले

अकोला दिव्य न्यूज : अकोल्यातील संगणक अभियंता तरुणीवरील बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीने सांगितलेला ‘कुरिअर बॉय’ प्रत्यक्षात तिचाच मित्र असल्याचे पोलिस तपासात उघड झाले असून तरुणीने दिलेली तक्रार आणि पोलिस चौकशीतून समोर आलेली माहिती, यामध्ये विसंगती निर्माण झाली आहे. तर घरी बोलाविलेल्या मित्रांने आपल्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. असं या तरुणीने जबाबात सांगितल्याने बलात्कार प्रकरणाचा तपास सुरूच राहणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, तपास सुरू आहे.

दरम्यान, घटनेच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या स्प्रेचा वापर झाला नाही. याशिवाय, तरुणीच्या मोबाइलमध्ये आढळलेला सेल्फी फोटो सहमतीने काढलेला असून, त्या खाली लिहिलेला मेसेजही तरुणीनेच लिहिल्याची कबुली तिने दिली आहे.तरुणीने दिलेली तक्रार आणि पोलिस चौकशीतून समोर आलेली माहिती, यामध्ये विसंगती निर्माण झाली आहे.

यासंदर्भात पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत आहे. तो गेल्या वर्षभरापासून पीडितेच्या संपर्कात होता. दोघांची ओळख समाज मेळाव्यात झाली होती. त्यांचा एकमेकांशी फोन आणि सोशल मीडियावर सतत संपर्क सुरू होता. तो तिच्या घरी येत असल्याचेही तपासात स्पष्ट झाले. इतकेच नव्हे; तर तो अनेकदा तिच्या घरी ‘फूड डिलिव्हरी अ‍ॅप’वरून पदार्थ ऑर्डर करून पाठवत होता.

…तरी ओळख नाकारली
घटनेच्या दिवशी तो सायंकाळी सव्वासातच्या सुमारास सोसायटीत येताना आणि पावणेनऊच्या सुमारास बाहेर पडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. पोलिसांनी त्याचा फोटो दाखवला असता तरुणीने त्याला ओळखत नसल्याचे सांगितले. मात्र, ती काही वेळ स्तब्ध झाली. ‘तुम्हाला हा फोटो कुठून मिळाला? असा प्रश्नही तिने पोलिसांना विचारला. ओळखत नाही, हे उत्तर देण्यापूर्वी एक ते दोन मिनिटे ती स्तब्ध झाली होती. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला. तांत्रिक तपासात स्पष्ट झाले, की आरोपी तरुण तिच्याच बोलावण्यावरून घरी आला होता.

44 रहिवाशांचे जबाब नोंदवले
तरुणाचा फोटो कोंढव्याच्या सोसायटीतील इतर 44 रहिवाशांना दाखवण्यात आला. कोणीही त्या दिवशी या तरुणाला भेटले नाही, असे रहिवाशांनी जबाबात सांगितले. यावरून तो तरुणीच्या घरीच आल्याचे निश्चित झाले.

कुरिअर बॉय, स्प्रे, सेल्फी आणि मेसेज या सर्व गोष्टी खोट्या असल्या, तरीही तरुणाने अतिप्रसंग केल्याचे पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. त्यामुळे बलात्कार प्रकरणाचा तपास सुरूच राहणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!