अकोला दिव्य न्यूज : अकोल्यामध्ये एका १६ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याने खळबळ उडाली आहे. पीडित मुलगी नीटच्या क्लाससाठी अकोला येथे कोचिंगला होती. परतवाड्याहून अकोला बस स्टँडवर उतरल्यावर ऑटो चालकाने जवाहरनगरला घेऊन जाताना रस्त्यात गैरवर्तन केले.

आरोपी जाफरखान सुभेदार खान याला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोला शहरात अनेक विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. मात्र, अशा घटनांमुळे मुला-मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवताना पालकांच्या मनात भीती निर्माण होतं आहे. पीडित मुलगी मागील वर्षभरापासून अकोल्यात नीटची तयारी करत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी बस स्टँडवर जवाहरनगरला जाण्यासाठी ऑटो शोधत होती. एका ऑटो चालकाने नकार दिल्यावर जाफरखान नावाचा ऑटोवाला तिला घेऊन जाण्यास तयार झाला. त्याने मुख्य पोस्ट ऑफिस रोडवरील अनोळखी रस्त्याने ऑटो नेला. मुलीला संशय आल्यावर तिने विरोध केला. तेव्हा ऑटो चालकाने तिचा हात पकडला आणि दंडाला चावा घेतला.

पीडितेच्या जबानीनुसार, आरोपीने तिचा विनयभंग केला. पोलिसांनी जाफरखान सुभेदार खान याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तो बकेट कारखान्याजवळ, शहनवाजपुरा, नयेगाव, अकोला येथे राहतो.

त्याच्या ऑटोचा क्रमांक MH-30, E-9497 आहे. या प्रकरणाचा तपास एएसआय राजेश जाधव करत आहेत. आरोपीवर अप. क्रमांक 227 /2025 कलम 74, 118, (1) 137 (2) BN. सहकलम 8 पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल आहे.ऑटो चालकाने फिर्यादीचा वाईट उद्देशाने हात पकडून स्वतःजवळ ओढले आणि डाव्या हाताच्या दंडाला चावा घेतला आणि नाबालिक अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला,असे फिर्यादीत म्हटले आहे.
