अकोला दिव्य न्यूज : आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळ्या अप्पर केजी व पहिल्या वर्गाचे विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशात आले होते. संस्थेचे अध्यक्ष प्रदीपसिंह राजपूत व मुख्याध्यापिका मनीषा राजपूत यांच्या हस्ते पालखी पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपशाम टीचर व कराळे टीचर यांनी तुळशीचे रोप देऊन राजपूत व राजपूत मॅडम यांचे स्वागत केले.

वर्ग चौथीची विद्यार्थिनी भार्गवी पाटील हिने पंढरपूरला निघणाऱ्या वारीचे महत्त्व विशद केले. वर्ग तिसरीची विद्यार्थिनी प्रियल इंगळे हिने एक सुंदर अभंग सादर केला. आर्या वासनकर, कृतिका कावळे, प्रियांशी वाडेकर, अनुष्का वरघडे, रिशिका जाधव या विद्यार्थिनींनी ‘रखुमाई रखुमाई’ या गाण्यावर नृत्य प्रस्तुती सादर केली.

वर्ग दुसरीचा विद्यार्थी अथर्व ढोले याने हरिपाठ सादर करून सर्वांची मने जिंकली. तर वर्ग दुसरीची विद्यार्थिनी सृष्टी शिरते व अथर्व ढोले यांनी फुगडी सादर करून जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद मिळवला. वर्ग पहिलीचे विद्यार्थी श्लोक टोबरे व संबोधी डोंगरे हे विठ्ठल व रुक्मिणी यांच्या वेशात कार्यक्रमात सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग चौथीचा विद्यार्थी स्वराज हरणे याने उत्तमरीत्या पार पाडले. शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा राजपूत यांनी आपल्या मराठी संस्कृतीचे, पंढरपूरला निघणाऱ्या वारीचे व आपल्या सणांचे महत्त्व विशद केले तसेच सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष राजपूत यांनी सुद्धा विठ्ठलाचा अभंग सादर करून सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला. विठू नामाच्या गजरात सर्व विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाची सकल्पना प्राचार्या राजपूत यांची तर प्रायमरी विभागाच्या प्रमुख प्राजक्ता उपश्याम यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.. नृत्यदिग्दर्शन श्रावणी मोहोड यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका सौ.कराळे, सौ.बोर्डे, सौ. भाले, सौ.देशमुख, सौ.जांभोरकर व सौ. धुमाळे तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व पालक वर्गाचे सहकार्य लाभले.
