Wednesday, July 9, 2025
HomeUncategorizedभाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारने धडक : एकाचा घटनास्थळी मृत्यू

भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारने धडक : एकाचा घटनास्थळी मृत्यू

अकोला दिव्य न्यूज : BJP MLA Suresh Dhas Son Sagar’s Car Hits Bike : भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारने एका दुचाकीला धडक दिली असून या अपघातात दुचाकीस्वार नितीन शेळके हे जागीच ठार झाले आहेत. सोमवारी (७ जुलै) रात्री १०.३० ते ११ च्या सुमारास हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

सागर सुरेश धस हे आष्टी येथून पुण्याला जात असताना सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या कारने नितीन शेळके यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात शेळके यांच्या मृत्यू झाला असून सुपा पोलीस या अपघात प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.”सागर धस हे सोमवारी रात्री आष्टीवरून पुण्याला जात होते.

यावेळी सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामरगाव परिसरात त्यांच्या कारने एका दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार नितीन शेळके यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुपा पोलीस या अपघात प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच याप्रकरणी गु्न्हा नोंदवण्याची प्रक्रिया चालू आहे. या अपघातात दोन्ही गाड्यांचं नुकसान झालं आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!