Wednesday, July 9, 2025
HomeUncategorizedअकोल्यात धक्कादायक घटना ! ‘कस्टमर एजंट’ कडून 'युनिट मॅनेजर तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

अकोल्यात धक्कादायक घटना ! ‘कस्टमर एजंट’ कडून ‘युनिट मॅनेजर तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

अकोला दिव्य न्यूज : शहरातील एका ‘हेल्थ इन्शुरन्स’ कंपनीत युनिट मॅनेजर पदावर कार्यरत २२ वर्षीय तरूणीवर त्याच कंपनीत ‘कस्टमर एजंट’ म्हणून कार्यरत गणेश ठाकूर याने अतिप्रसंग करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे कंपनी आणि महिलांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा अकोला पोलिस, विशेषतः सिव्हील लाइन पाेलिसांच्या कार्य क्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी ८ जुलै राेजी रात्री उशिरा सिव्हील लाइन पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी ठाकूरला अटक करण्यात आली आहे.

संग्रहित छायाचित्र

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नेहमीप्रमाणे १६ जून २०२५ रोजी, पीडित तरुणी ड्युटीवर हजर असताना, याच कंपनीत ‘कस्टमर एजंट’म्हणून कार्यरत गणेश ठाकूरने ‘कस्टमर कॉल’ असल्याचे सांगून सदर तरूणीला चारचाकी वाहनातून बाहेर नेले. सायंकाळी साडेसहा वाजता, जठारपेठ चौकात एका दूध डेअरीसमोर कार थांबवून आरोपी मागच्या सीटवर जाऊन बसला आणि तिचा हात पकडून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने आरडाओरड केल्यावर त्याने तोंड दाबून मारहाण केली. मात्र, आत्मविश्वास आणि प्रसंगावधान राखत तिने आरोपीच्या गुप्तांगावर लाथ मारली आणि कारमधून बाहेर पडून सुटका केली. घटनेनंतर आरोपीने पीडितेला मोबाईलवरून धमक्या देत आत्महत्येच्या आरोपात अडकवण्याचा प्रयत्न केला.

अखेर तिने ८ जुलै राेजी रात्री सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गणेश ठाकूरविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७५(२), ७६, ३५१(२)(३) अंतर्गत गुन्हा दाखल करून आराेपीला अटक केली. तसेच त्याचे वाहन जप्त करण्यात आले आहे. 

सिव्हील लाइन पाेलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह पोलिसांनी केवळ गुन्हे नोंदवून जबाबदारी संपवण्याचा काळ आता गेला आहे. आता वेळ आहे, गुन्हेगारांच्या मनात पोलिसांचा खऱ्या अर्थाने धाक निर्माण करण्याची ! या घटनेमुळे शहरातील तरुणी, शाळकरी विद्यार्थीनी व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर बनल्याचे समाेर आले आहे. परंतु मागील घटना पाहता सिव्हील लाइन पाेलिसांचा धाक कागदापुरता मर्यादित असल्याचे बाेलल्या जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!