Saturday, July 12, 2025
HomeUncategorizedकपिलच्या कॅनडा येथील नुकत्याच सुरू केलेल्या ‘कॅप्स कॅफे’वर गोळीबार

कपिलच्या कॅनडा येथील नुकत्याच सुरू केलेल्या ‘कॅप्स कॅफे’वर गोळीबार

अकोला दिव्य न्यूज : Kapil Sharma Cafe Firing : ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मुळे घराघरांत लोकप्रिय झालेला कॉमेडियन कपिल शर्मा संबंधित एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कपिलच्या कॅनडामधील सरे इथे नुकत्याच सुरू केलेल्या ‘कॅप्स कॅफे’वर गोळीबार करण्यात आला आहे. कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी यांनी काही दिवसांपूर्वीच हा कॅफे सुरू केला होता.

संग्रहित छायाचित्र

कॅफे सुरू झाल्याच्या अवघ्या तीन दिवसांतच त्यावर हल्ला करण्यात आला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती गाडीत बसून बंदुकीने कॅफेच्या दिशेने गोळ्या झाडताना दिसत आहे. या घटनेची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग उर्फ लड्डी याने घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्याची जबाबदारी बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) या खलिस्तानी दहशतवादी संघटनेने घेतली आहे. या संघटनेशी संबंधित हरजीत सिंग लड्डीचे या प्रकरणात मुख्य नाव म्हणून समोर आलं आहे. लड्डी हा भारताच्या NIA (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) च्या ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवाद्यांपैकी एक आहे आणि याआधीही अनेक गंभीर घटनांमध्ये त्याचं नाव आल्याचं वृत्त आहे.

लड्डीने कपिल शर्माच्या कॅफेवर झालेल्या गोळीबारामागे आपणच असल्याचा दावा सोशल मीडियावर केला आहे. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नाही, मात्र आसपासच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या स्थानिक पोलिस आणि तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.लड्डीची सोशल मीडिया पोस्ट समोर आली आहे, त्यात त्याने असे म्हटले की, ‘कपिल शर्माच्या कॉमेडी शोच्या एका भागात एका पात्राने निहंग शिखांचा पोशाख किंवा वर्तनाबद्दल काही विनोदी टिप्पणी केली.

आम्ही कपिल शर्माच्या मॅनेजरशी अनेक वेळा फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आमच्या सर्व कॉलकडे दुर्लक्ष करण्यात आले. कपिलने सार्वजनिकरित्या माफी मागावी, अशी मागणी या पोस्टमधून करण्यात आली होती. TOI या पोस्टबाबत वृत्त दिले आहे. पोलिसांकडून याबद्दल अधिक तपास केला जातो आहे.

दरम्यान, कपिलची पत्नी गिन्नीने काही दिवसांपूर्वीच या कॅफेची पहिली झलक शेअर केली होती. गुलाबी रंगाच्या थीममध्ये सजवलेली ही जागा अनेकांच्या पसंतीस पडली. एका कंटेंट क्रिएटरने शेअर केलेल्या व्हिडीओद्वारे कॅफेमधील गुलाबी आणि पांढऱ्या रंगांच्या सजावटीची आणि आकर्षक इंटिरियरची खास झलक पाहायला मिळाली.  

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!