Tuesday, July 15, 2025
HomeUncategorizedफाशी तूर्तास टळली ! केरळची नर्स निमिषा प्रियावर येमेनमध्ये हत्येचा गुन्हा

फाशी तूर्तास टळली ! केरळची नर्स निमिषा प्रियावर येमेनमध्ये हत्येचा गुन्हा

अकोला दिव्य न्यूज : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशी लांबणीवर गेली आहे. सुत्रांच्या हवाल्यानं ही माहिती समोर आली आहे. यमनमध्ये १६ जुलैला निमिषाला फाशी दिली जाणार होती. निमिषाची फाशी टाळण्यासाठी भारत सरकारकडून हरतऱ्हेचे प्रयत्न सुरु आहेत. प्रकरणाचं गांभीर्य पाहता निमिषाचा जीव वाचवणं अवघड आहे. पण आताच हाती असलेल्या वृत्तानुसार, निमिषाची फाशी पुढे ढकलली गेली आहे.

यमनच्या न्यायालयानं निमिषा प्रियाला हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली आहे. ती २०१७ पासून तुरुंगात आहे. येमेनी नागरिक तलाल एब्दो महदीच्या हत्येच्या आरोपात दोषी आढळली आहे. महदीजवळ असलेला पासपोर्ट परत मिळवण्यासाठी त्याला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन दिलं. पण त्या इंजेक्शनच्या ओव्हरडोसमुळे महदीचा मृत्यू झाला.


केरळच्या पलक्कडची रहिवासी असलेली निमिषा तिचा पती आणि मुलीसोबत जवळपास १० वर्षांपासून येमेनमध्ये काम करत होती. २०१६ मध्ये येमेनमध्ये गृहयुद्ध सुरु झालं. देशात यादवी माजली. या कालावधीत देशात येण्याजाण्यावर निर्बंध आले. मात्र त्याआधीच म्हणजेच २०१४ मध्ये निमिषाचा पती आणि मुलगी भारतात परतले होते. पण निमिषा भारतात परतू शकली नाही. यानंतर २०१७ मध्ये निमिषावर एका येमेनी नागरिकाची हत्या केल्याचा आरोप झाला. ७ मार्च २०१८ रोजी येमेनच्या न्यायालयानं निमिषाला फाशीची शिक्षा सुनावली.
कोणत्या कायद्याखाली निमिषाला शिक्षा?
येमेनमध्ये शरिया कायदा लागू आहे. या कायद्यानुसार हत्येच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा सुनावली जाते. पण ब्लड मनीच्या प्रथेनुसार हत्या प्रकरणात दोषी असलेल्या व्यक्तीला माफी दिली जाऊ शकते. त्यासाठी मृताच्या कुटुंबाला आर्थिक स्वरुपात नुकसान भरपाई द्यावी लागते. ही रक्कम खूप जास्त असते. मृताचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांच्याशी चर्चा करुन ही रक्कम ठरते.

निमिषाला येमेनमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर लगेचच तिला ब्लड मनी देऊन सोडवण्याचा विषय समोर आला. इस्लामच्या जाणकारांनुसार, यामुळे गुन्हेगाराला माफी मिळते. सोबतच आर्थिक मदतीमुळे पीडित कुटुंबाला काही प्रमाणात न्यायदेखील मिळतो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!