अकोला दिव्य न्यूज : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी प्रभागाच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार निर्वाचक गण रचनेचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात आले आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी निर्गमित केला. मसुद्याबाबत हरकती असल्यास तहसीलदार यांच्याकडे दि. २१ जुलैपूर्वी लेखी सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अकोला जिल्हा परिषदेची ५२ इतकी निश्चित करण्यात आली आहे.
प्रारूपानुसार,

तेल्हारा तालुक्यात दानापूर, अडगाव बु,, शिरसोली, बेलखेड, पाथर्डी, दहेगाव, भांबेरी असे ७ निवडणूक विभाग आहेत.
अकोट तालुक्यात उमरा, अकोलखेड, अकोली जहाँगीर, वडाळी देशमुख, मुंडगाव, वरूर, कुटासा, चोहोट्टा असे ८,
मुर्तिजापूर तालुक्यात लाखपुरी, शेलू बाजार, कुरूम, माना, शिरसो, हातगांव, कानडी असे ७ सर्कल आहेत.
अकोला तालुक्यात आगर, दहिहंडा, घुसर, उगवा, बाभुळगाव, कुरणखेड, कानशिवणी, बोरगाव मंजू, चांदूर, चिखलगाव असे १० सर्कल आहेत.
बाळापूर तालुक्यात अंदुरा, हाथरूण, निमकर्दा, व्याळा, पारस, देगाव, वाडेगाव असे ७ विभाग निश्चित करण्यात आले आहेत.
बार्शिटाकळी तालुक्यात कान्हेरी सरप, दगडपारवा, पिंजर, झोडगा, महान, राजंदा, जामवसू असे एकूण ७ आणि पातुर तालुक्यात शिर्ला, चोंडी, विवरा, सस्ती, पिंपळखुटा, आलेगाव असे ६ निवडणूक विभाग आहेत.
पंचायत समिती
तेल्हारा- १४
अकोट-१६
मूर्तिजापूर-१४
अकोला-२०
बाळापूर-१४
बार्शिटाकळी-१४ आणि पातुर १२. मसुद्यानुसार, तेल्हारा पं.स मध्ये दानापूर, सौंदळा, अडगाव बु, खंडाळा, शिरसोली, तळेगाव बु., बेलखेड, माळेगाव बाजार, पाथर्डी, घोडेगाव, दहेगाव, वाडी अधमपूर, भांबेरी, नरसीपूर, अकोट तालुक्यात उमरा, कासोद शिवापूर, अकोलखेड, मोहाळा, अकोली जहाँगीर, पणज, वडाळी देशमुख, आसेगाव बाजार, मुंडगाव, अडगाव खु, वरूर, देवरी, कुटासा, रेल, चोहोट्टा, केळीवेळी असे पं. स. निर्वाचक गण आहेत.
मूर्तिजापूर पं. स. मध्ये भटोरी, लाखपुरी, बोरटा, शेलू बाजार, कवठा (सोपीनाथ), कुरूम, माना, जामठी बु., सिरसो, जांभा बु., हातगाव, उमरी, कानडी, धोत्रा (शिंदे) असे सर्कल आहेत.
अकोला तालुक्यात आगर, सांगवी खुर्द, दहीहंडा, म्हैसांग, घुसर, आपातापा, उगवा, भौरद, बाभूळगाव, सांगळूद बु., कुरणखेड, पळसो बु., कानशिवणी, पातूर नंदापूर, बोरगाव मंजू क्र. १ व २, चांदुर, कुंभारी, चिखलगाव, गोरेगाव खु. असे गण आहेत.
बाळापूर तालुक्यात अंदुरा, निंबा, हाथरूण, लोहारा, निमकर्दा, मोरगाव सादिजन, व्याळा, गायगाव, पारस क्र. १ व २, देगाव, बटवाडी बु., वाडेगाव क्र. १ व २ असे गण आहेत.
बार्शिटाकळी तालुक्यात कान्हेरी सरप, विझोरा, दगडपारवा, राहित, पिंजर, मोहळ, झोडगा, टिटवा, महान, हातोला, राजंदा, पुनोती बु., जामवसू, साखरवीरा, तसेच पातुर तालुक्यात दिग्रस बु., शिर्ला, खानापूर, चोंडी, विवरा, बाभुळगाव, सस्ती, मळसूर, पिंपळखुटा, उमरा, आलेगाव, सावरगाव असे निर्वाचक गण आहेत.