Thursday, July 31, 2025
HomeUncategorizedमोरया ! यंदा गणेशभक्‍तांना वाढत्‍या किंमतीची झळ मूर्तीं ३० टक्‍क्‍यांनी महाग

मोरया ! यंदा गणेशभक्‍तांना वाढत्‍या किंमतीची झळ मूर्तीं ३० टक्‍क्‍यांनी महाग

अकोला दिव्य न्यूज : विघ्नहर्ता-सुखकर्ता गणरायाचे आगमन आणि त्या अनुषंगाने साजरे केले जाणार गणेशोत्‍सवाला जेमतेम महिना उरला असल्याने सध्‍या गणेश मूर्ती तयार करणाऱ्या कारागीरांची घाई गडबड सुरू आहे. या वर्षी या व्यवसायावर पीओपी गणेशमूर्ती बंदीचे सावट होते. याचा परिणाम गणेशमूर्तींच्या उत्पादनावर झाला आहे. तर पीओपीच्‍या मूर्तींवरील बंदी उठल्‍याने मूर्तीकार खुश असले तरी यंदा गणेशमूर्तींच्‍या वाढत्‍या किंमतीची झळ गणेशभक्‍तांना बसणार आहे. यंदा गणेशमूर्तींच्‍या किंमती ३० टक्‍क्‍यांनी महागल्या आहेत.

यंदा पीओपीवरील बंदीमुळे मुर्तीकारांमध्‍ये संभ्रमाचे वातावरण होते. बहुतांश कार्यशाळांमध्‍ये काम ठप्‍प होते. तिथं काम सुरू होते ते मंदगतीने सुरू होते. कारागीरांनाही काम नव्‍हते यंदा गणेशमूर्ती शाडूमातीच्‍या बनवायच्‍या की पीओपीच्‍या याबाबतचा संभ्रम जूनच्‍या पहिल्‍या आठवडयापर्यंत कायम होता. त्यामुळे निराशाजनक परिस्थिती होती. याचा परिणाम  गणेशमूर्तींच्या उत्पादन यंदा कमी झाले आहे.

जून महिन्यातील ९ जूनला पीओपी गणेशमूर्तींवरील बंदी उठली. त्यामुळे गणेशमूर्ती बनवण्याच्या कामाला पुन्हा वेग आला, पण दरवर्षीच्या तुलनेत तयार झालेल्या मूर्तींची संख्या कितीतरी कमी असल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे. बंदी उठल्‍यानंतर मोठया प्रमाणात पीओपी गणेशमूर्तींची मागणी नोंदवायला सुरूवात केली, परंतु आता वेळेअभावी मागणी इतका पुरवठा करू शकत नाही, असं मूर्तीकार सांगतात.

दरवर्षी कच्च्या मालांच्या किमती वाढल्याने साधारणतः मूर्तींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांची वाढ होत असते. यंदा ती वाढ आहेच, पण मागणीच्या तुलनेत गणेशमुर्तीं कमी  उपलब्ध असल्याने किमती आणखीन १५ टक्क्यांची भर पडल्याने यावर्षी गणेशमूर्तींच्या किमती ३० टक्क्यांनी महागल्याचे गणेशमूर्तीकारांकडून सांगितले जात आहे.

माघी गणेशोत्‍सवापासूनच पीओपीच्या मुर्ती बंदीचा मुद्दा चर्चेत आला आणि मूर्तीकारांमध्‍ये निराशा पसरली होती. आता बंदी उठली असली तरी एवढया कमी वेळात जेवढी मागणी आहे. त्‍या प्रमाणात मुर्तीकार पुरवठा करू शकत नाही. या परीस्थितीत मूर्तींच्‍या किंमती 30 टक्‍क्‍यांनी वाढवण्‍याशिवाय पर्याय उरलेला नाही.

महत्वाची गोष्ट म्हणजे यंदा गणेशोत्सव जवळपास एक महिना अगोदर आला आहे. त्यामुळे आता गणेशमूर्ती तयार करून त्यांचे वितरण  करणेही अशक्य आहे. त्यामुळे गणेशमूर्तींच्या किमती वाढल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!