अकोला दिव्य न्यूज : थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांसाठी हरीशभाई हे देवदूतच असून शहराच्या मध्यवर्ती भागात यासाठी भव्य वास्तु उपलब्ध करुन देण्यासोबतच डाॅक्टर, परिचारिका आणि शिक्षित कर्मचारी यांची उपलब्धता असलेले डे केअर सेंटर अशा प्रकारे या रूग्णाच्या सेवेसाठी सर्वोच्च समर्पण फक्त हरीशभाई आलिमचंदाणी यांचा व्यतिरिक्त कोणासही शक्य नाही, असा शब्दात रुग्णांचे कुटुंबिय व उपस्थित मान्यवरांनी या कार्याची प्रशंसा करून हे ईश्वरी कार्य असल्याचे सांगितले.

थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांचा बोनमॅरो मॅच करण्यासाठी रूग्णाच्या आई-वडील, भाऊ-बहीण यांचे सॅम्पल घेऊन अकोला डे केअर सेंटर व संकल्प फाऊंडेशनतर्फे अहमदाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविले जाते. याठिकाणी बोनमॅरो मॅच झाल्यावर विशिष्ट प्रक्रियेद्वारे ऑपरेशन करून या व्याधीतून रूग्णाला कायमची मुक्ती मिळते. या ऑपरेशनचा खर्च जवळपास 16 ते 17 लाख पर्यंत येतो. साधारण परिस्थितीतील रुग्णाचे कुटुंबिय हा खर्च करण्यास असमर्थ असतात. ही बाब लक्षात घेऊन हरीशभाई यांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आणि डे केअर सेंटर, संकल्प फाउंडेशन आणि केन्द्र सरकार यांच्या कडून जो निधी मिळतो. त्यामाध्यमातून हे ऑपरेशन होत आहेत.
थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांचा बोनमॅरो मॅच करण्यासाठी डे केअर सेंटर येथे आयोजित एच.एल.ए कॅम्पच्या अनौपचारिक उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करतांना उपरोक्त प्रतिपादन केले.
कार्यक्रमात डॉ. वंदना बागडी, डॉ वरठे, अमरावती येथील इर्वीन हॉस्पिटलचे मनोज सहारे, धार्मिक वोरा उपस्थित होते.संकल्प फाउंडेशन व्यापारी नेते मनोहर पंजवानी, गायत्री भवन ट्रस्टचे अध्यक्ष मुरलीधर जेठवानी उपस्थित होते. प्रस्तावना हरीशभाई आलिमचंदानी यांनी केले. संचालक नुतन जैन तर आभार प्रदर्शन अश्विन पोपट यांनी केले.