Wednesday, July 30, 2025
HomeUncategorizedश्री राजपूत करणी सेना जिल्हाध्यक्षपदी बघेल तर शहराध्यक्षपदी पप्पू ठाकूर

श्री राजपूत करणी सेना जिल्हाध्यक्षपदी बघेल तर शहराध्यक्षपदी पप्पू ठाकूर

अकोला दिव्य न्यूज : सकल राजपूत समाजातील युवापिढीच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या अकोला शहर व जिल्ह्यातील श्री राजपूत करणी सेनेची नवीन जिल्हा व शहर कार्यकारिणी निवडण्यासाठी प्रदेश उपाध्यक्ष ठाकूर सागर सिंह बघेल यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन अकोला जिल्हाध्यक्षपदी नवजोतसिंह बघेल तर शहराध्यक्षपदी पृथ्वीराजसिंह चौहान (पप्पू ठाकूर) यांची अविरोध निवड करण्यात आली.

येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत मनोजसिंह बिसेन, मनीषसिंह बिसेन, अजयसिंह गौर, सूरजसिंह ठाकूर, दुष्यंतसिंह चौहान, देवेंद्रसिंह चौहान, समीरसिंह सिसोदिया, राजकमलसिंह चौहान, शंकरसिंह चौहान, संदीपसिंह ठाकूर, कपिलसिंह ठाकूर, भरतसिंह ठाकूर, नितिनसिंह गौतम यांच्यासह शहर व परिसरातील सकल राजपूत समाजातील मान्यवर आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजपूत समाजासाठी उल्लेखनीय योगदानाबद्दल संदीपसिंह ठाकूर आणि करणसिंह ठाकूर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी जाहीर करण्यात आलेल्या अकोला जिल्हा कार्यकारिणीत जिल्हाध्यक्ष नवजोतसिंह बघेल तर उपाध्यक्षपदी सतपालसिंह राजपूत, राहुलसिंह ठाकूर, महासचिवपदी योगेशसिंह ठाकूर, सहसचिव अमनसिंह चौहान, जिल्हा संघटक जितेंद्रसिंह ठाकूर, तिलकसिंह ठाकूर तर कार्यकारिणी सदस्य म्हणून सुनीलसिंह ठाकूर, कन्हैयासिंह ठाकूर, नीरजसिंह सेगर, भारतसिंह ठाकूर आणि विधी सल्लागार म्हणून अँड.आवेशसिंह चौहान, दीपकसिंह ठाकूर यांची निवड करण्यात आली.

यासोबतच जाहीर करण्यात आलेल्या अकोला शहर कार्यकारिणीत अध्यक्षपदी पृथ्वीराजसिंह चौहान (पप्पू ठाकूर) तर शहर उपाध्यक्ष म्हणून परागसिंह सूर्यवंशी, गोपालसिंह ठाकूर, विशालसिंह सूर्यवंशी, मयूरसिंह ठाकूर आणि सचिवपदी रोहित सिंह ठाकूर, रोहनसिंह गौतम आणि सहसचिवपदी चेतनसिंह चौहान यांची निवड केली गेली आहे.

कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष नवजोतसिंह बघेल, शहर अध्यक्ष आकाश ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष ठाकूर सागरसिंह बघेल, विदर्भ उपाध्यक्ष पवनसिंह ठाकूर यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करीत समाजकार्य करण्यासाठी मार्गदर्शन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!