अकोला दिव्य न्यूज : जनारोग्यास घातक असलेली गुटखा पुडीची गैर कायदेशीररित्या, सरेआम सुरू असणारी विक्री तातडीने बंद करा आणि छोट्या छोट्या दुकानदारावर केली जात असलेली कारवाई थांबवून सरळ गुटखा माफियांवर कारवाई करा, अशी मागणी करत शिवसेना शहर प्रमुख अँड.पप्पू मोरवाल यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषधी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
आपले खिसे भरून अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी गुटखा माफिया यांना अभय देत असल्याचे दिसून येते आहे. तेव्हा अशा सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे.

यावेळी शहर प्रमुख पप्पू मोरवाल, जिल्हा सरचिटणीस राहुल जाधव, शिक्षक आघाडी जिल्हा प्रमुख अर्जुन देशमुख, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख सागर कुटे, जिल्हा सचिव सतिश गोपनारायण,
शहर महासचिव शुभम डाहाके, राजेश पिंजरकर, शहर संघटक शुभम वानखडे, उपशहर प्रमुख अश्विन लाडके,उपशहर प्रमुख राजेश कलाने उपशहर प्रमुख रोहित बंदले, उपशहर प्रमुख मंगेश काबडे उपशहर प्रमुख, सूरज राजपुत, उपशहर प्रमुख स्वप्नील देशमुख, उपशहर प्रमुख सर्वेश आवारे, शहर सचिव सुनील दिवनाले, शाखा उपाध्यक्ष संजय चंडकेसला व शिवसैनिक उपस्थित होते.