अकोला दिव्य न्यूज : Army officer attacks SpiceJet employees at Srinagar airport Video : श्रीनगर विमानतळावर अतिरिक्त केबिन लगेजवरून झालेल्या वादानंतर एका लष्करी अधिकाऱ्याने स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा घटनेत चार कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाली असल्याचे विमान कंपनीने म्हटले आहे.

विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्याला तो परवानगी असलेल्या ७ किलोच्या मर्यादेपेक्षा जास्त केबिन लगेज घेऊन जाऊ शकत नाही असे सांगितल्यानंतर त्याने लाथा आणि बुक्क्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. इतकेच एक कर्मचारी बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला, मात्र तो व्यक्ती कर्मचाऱ्याला लाथा घालत राहिली असे विमान कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान या मारहाणीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
देशभरातील विमानतळ सुरक्षा हाताळणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (CISF) सांगण्यात आले की त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
इतकेच नाही तर लष्कराने देखील या घटनेची दखल घेतली असून या प्रकरणात लक्ष घालाणार असल्याचे आणि चौकशीत मदत करम्यार असल्याचे म्हटले आहे.
श्रीनगरहून दिल्लीला जाणाऱ्या फ्लाइट SG-386 च्या बोर्डिंग गेटजवर एका प्रवाशाने स्पाइसजेटच्या चार कर्मचाऱ्यांना अत्यंत वाईट पद्धतीने मारहाण केली. ठोसे, लाथांनी हल्ला केल्याने आमच्या कर्मचाऱ्याला स्पाइनल फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर जखम झाली आहे,असे एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे.
स्पाइसजेटचा एक कर्मचारी बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला पण प्रवासी त्या बेशुद्ध पडलेल्या खर्मचाऱ्याला लाथा मारत राहिला. बेशुद्ध कर्मचाऱ्याला मदत करण्यातसाठी दुसरा एक कर्मचारी वाकला असता त्याच्या जबड्यावर जोरात लाथ बसल्याने त्याच्या नाक आणि तोंडातून रक्तस्त्राव झाला. जखणी कर्मचाऱ्याला तात्काळ रुदिणालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्या गंभीर दुखापतींवर उपचार केले जात आहेत,” असे विमान कंपनीनेने म्हटले आहे.
नेमकं काय झालं?
वरिष्ठ लष्करी अधिकारी असलेल्या प्रवाशाकडे एकूण १६ किलो वजनाचे दोन केबिन बॅगेज होते, जे की परवानगी असलेल्या ७ किलो वजनाच्या मर्यादेच्या दुपटीपेक्षाही जास्त होते. जेव्हा त्यांना नम्रपणे त्यांच्याकडील अतिरिक्त बॅगेजबद्दल सांगण्यात आले आणि त्यासाठी लागू असलेले शुल्क भरण्यास सांगितले गेले, तेव्हा त्यांनी नकार दिला आणि बोर्डिंग प्रक्रिया पूर्ण न करताच जबरदस्तीने एरोब्रिजमध्ये प्रवेश केला, हे एक विमान सुरक्षा नियमांचे स्पष्ट उल्लंघन आहे. त्यांना सीआयएसएफ अधिकाऱ्याने परत गेटकडे आणले,असे निवेदनात म्हटले आहे.
गेटवर आणल्यानंतर प्रवासी जास्तच आक्रमक झाला आणि त्याने विमान कंपनीच्या ग्राउंड स्टाफच्या चार सदस्यांवर हल्ला केला, असेही कंपनीने म्हटले आहे.
स्थानिक पोलिसांकडे एफआयआर नोंदवण्यात आला आहे आणि एअरलाइनने नागरी विमान वाहतूक नियमांनुसार प्रवाशाला नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. स्पाइसजेटने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला पत्राद्वारे त्यांच्या कर्मचाऱ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची माहिती दिली आहे आणि प्रवाशाविरोधात योग्य कारवाई करण्याची विनंती केली आहे, असेही विमान कंपनीने त्यांच्या निवेदनात सांगितले आहे.