Thursday, August 7, 2025
HomeUncategorizedआजपासून नेमकं काय होणार ? 50 टक्के टॅरिफचा भारतातील कुठल्या क्षेत्रांना बसणार...

आजपासून नेमकं काय होणार ? 50 टक्के टॅरिफचा भारतातील कुठल्या क्षेत्रांना बसणार फटका ?

अकोला दिव्य न्यूज : Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादण्याच्या आदेशावर सही केली आहे आणि यापूर्वी ट्रम्प यांनी ३० जुलै रोजी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादण्याचा आदेशानुसार आज गुरुवार ७ ऑगस्ट २०२५ पासून २५ टक्के टॅरिफ वसूली सुरू झाली आहे. आता अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणेचा फटका कुठल्या क्षेत्रांना बसणार आहे हे आपण जाणून घेऊ.

कुठल्या क्षेत्रांना बसणार फटका?
डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयाचा फटका टेक्सटाईल, फार्मा, ऑटो, स्टील आणि अॅल्युमिनियम, सौर उपकरणं, आयटी सर्व्हिसेस या क्षेत्रांना फटका बसू शकतो. ऑटो पार्ट्स, टेक्स्टाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स सारख्या उद्योगांना टॅरिफचा फटका बसू शकतो. स्टील, केमिकल आणि फार्मा उद्योगांनाही मोठा फटका बसू शकतो, ज्यामुळे त्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागू शकतो अशी चिन्हं आहेत.

कापड व्यवसायासमोर सर्वात मोठं आव्हान
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका कापड व्यवसायाला बसण्याची चिन्हं आहेत. भारतात अर्ध्याहून अधिक आयातीत अमेरिकेन कॉटनचा उपयोग होतो. भारतातील टेक्स्टाइल व्यवसायावर सध्याच्या घडीला १० ते १२ टक्के टॅरिफ आहे. आता ५० टक्के टॅरिफ द्यावा लागणार असल्याने भारतीय कापड व्यापाऱ्यांना मोठा दणका बसणार आहे.

फार्मा आणि ऑटो क्षेत्रालाही फटका
फार्मा म्हणजेच औषध कंपन्यांनाही वाढलेल्या टॅरिफचा मोठा फटका बसणार हे उघड आहे. फार्मा उत्पादनांना जर टॅरिफमधून सूट मिळाली नाही तर औषधांच्या किंमतीत वाढ होणार हे सूर्यप्रकाशाइतकं लख्ख सत्य आहे. तसंच या वाढलेल्या टॅरिफमुळे ऑटो सेक्टरलाही मोठा फटका बसणार आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

रत्ने आणि दागिन्यांच्या किंमतीतही वाढ होणार?

रत्नं आणि दागिन्यांनाही फटका बसण्याची चिन्ंह आहेत. कारण या वस्तूंवर सध्या २७ टक्के टॅरिफ आहे. त्यावर आणखी २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ द्यावा लागणार आहे. त्याचा परिणाम प्रॉफिट मार्जिनवर होऊ शकतो.भारत जे कच्चं तेल खरेदी करतो त्यातला जवळपास ४० टक्के भाग रशियाकडून विकत घेतो. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ओमएसी यांना या कच्च्या तेलावर काही प्रमाणात सूट मिळत होती. मात्र आता ती आता मिळू शकणार नाही. रशियाकडून भारत तेल खरेदी करतो म्हणूनच अतिरिक्त टॅरिफ अमेरिकेने लादलं आहे. सौर उपकरणांच्या आणि इतर साधनांच्या किंमतींवरही परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे आयटी सर्व्हिसेस, एफएमसीजी, टेलिकॉम, रिअल इस्टेट, बँक इन्शुरन्स, कॅपिटल गुड्स यांच्यावरही अतिरिक्त टॅरिफचा गंभीर परिणाम होण्याची चिन्हं आहेत.

अन्यायकारक, अनुचित, अवाजवी
अमेरिकेने लावलेले ५० टक्के टॅरिफ ‘अन्यायकारक, अनुचित व अवाजवी’ असल्याचे भारताने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, देशाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील. तेल आयात ही बाजारातील स्थिती व १४० कोटी भारतीयांच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी केली जाते आणि असे पाऊल इतरही अनेक देश उचलत आहेत.

आर्थिक ब्लॅकमेल!
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी  म्हणाले, ५० टक्के टॅरिफ हे भारताला अन्यायकारक व्यापार करारासाठी धमकावणारे ‘आर्थिक ब्लॅकमेल’ आहे. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!