अकोला दिव्य न्यूज : भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना लोकशाहीचे महत्त्व कळावे, त्यांच्यात नेतृत्व गुणांची रुजवणूक व्हावी, समाज सेवेबद्दल त्यांच्यात आवड निर्माण व्हावी, ह्या हेतूने प्रभात किड्स स्कूलमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी मंडळ निर्वाचित केले असून नवनियुक्त विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाचा शपथविधी सोहळा प्रभात किड्स स्कूलच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सुरुवातीला शाळेच्या एनसीसीच्या कॅडेट्सनी सर्व विद्यार्थी संसद सदस्यांना सन्मानपूर्वक सभा मंचावर आणले. प्रभातच्या प्राचार्य वृषाली वाघमारे यांनी नवनिर्वाचित विद्यार्थी प्रतिनिधींना पदाची शपथ दिली. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य अर्चना बेलसरे, व्यवस्थापक अभिजीत जोशी, समन्वयक मो. आसिफ प्रामुख्याने उपस्थित होते. स्कूल हेड बॉय म्हणून रैवत देशपांडे याने पदाची शपथ घेतली तर हेड गर्ल म्हणून गार्गी गरकल हिने पदाची शपथ घेतली. तसेच प्रणील नावकार असिस्टंट हेड बॉय तर मधुरा वाघ हिने असिस्टंट हेड गर्ल म्हणून शपथ घेतली.

विद्यार्थी प्रतिनिधी मंडळातील सदस्य अलंकार डंबाळे, ओजस्वी पुरी, अपुर्वा मिटकरी, हंसिका तहलरामानी, वीर जयस्वाल, रेणुका रहाटे, आदर्श दलाल, अनुष्का टकरानी, अथर्व आखरे, शाश्वत महल्ले यांना त्यांच्या पदांची शपथ देण्यात आली. सोबतच शाळेतील चारही हाऊस कॅप्टन तथा व्हाइस कॅप्टन पदासाठी निवड झालेल्या शर्वरी गरकल, गार्गी गावंडे, अनुष्का मेंढे, स्वर्णिमा घुले, पार्थ देशमुख, सुज्वल चव्हान, शौर्य जयताडे व प्रिशा बंदीवान यांना त्यांच्या पदाची शपथ देण्यात आली.

आजचा विद्यार्थी उद्याचा सुजाण नागरिक असणार आहे. विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा निकोप विकास साध्य होणार असून त्यांच्यामध्ये स्वयं-शासनाची गोडी निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन प्राचार्य वृषाली वाघमारे यांनी केले.

प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका सौ. वंदना नारे, सचिव निरज आवंडेकर, अशोक ढेरे, ज्येष्ठ रंगकर्मी अरुण घाटोळे, व्ही. अनुराधा, समन्वयक (सीबीएसई) प्रशांत होळकर यांच्यासह पालकवर्ग उपस्थित होता. शिस्तबद्ध रितीने पार पडलेल्या या सोहळ्याचे प्रास्ताविक उपप्राचार्य अर्चना बेलसरे यांनी केले.

त्यांनी 5 जुलैपासून सुरू झालेल्या संपूर्ण निवडणूक प्रक्रीयेचा आढावा घेतला. निवड प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा, मुलाखत व त्यानंतर त्याचे उत्कृष्ट सादरीकरण दिले तर तज्ज्ञ परीक्षकांनी अत्यंत चोख परीक्षण करून प्रतिनिधींची निवड केली. संचालन शरयु राऊत, व अक्षरा इंगळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन स्वराली जामकर यांनी मानले.

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे यांच्या संयोजनात सामाजिक शास्त्र विभाग प्रमुख राहुल निलटकर, झीनल सेठ, दिनेश पाटील, समीर कुलकर्णी, अतुल डोंगरे, सागर पारेकर, श्रुती गोरे, स्वप्नाली बंड, वेद कळमकर, अनुराग भिरड, पंकज देशमुख, दिनेश आगाशे, अक्षय कळमकर, सचिन मुरुमकार, प्रशांत तळोकार व श्रीकांत बुलबुले यांनी अथक परिश्रम घेतले.
