अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्रातून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-2 प्रथम क्रमांक प्राप्त प्रभात किड्स स्कूल मधील ईशिका झांबरे हिने 4थी सब-ज्युनियर राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप -2025 स्पर्धेमध्ये भारतातून प्रथम क्रमांक पटकाविला तर गार्गी राऊत हिने तिसरा क्रमांक मिळवीत घवघवीत यश संपादीत केले.

उत्तर प्रदेश नोएडा येथे बॉक्सींग फेडरेशन ऑफ इंडियातर्फे 4 थी सब-ज्युनियर मुले व मुली राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धा 7 ते 13 ऑगस्ट 2025 दरम्यान आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ईशिका झांबरे या बॉक्सरने प्रतिस्पर्धी खेळाडूंना धूळ चारत गोल्ड मेडल पटकावत प्रथम क्रमांक पटकाविला. तर गार्गी राऊत हिने कांस्य पदक पटकावून तिसरा क्रमांक प्राप्त केला. शाश्वतला जिल्हा क्रीडा अधिकारी व आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग कोच सतीशचंद्र भट तसेच प्रभातचे क्रीडा प्रशिक्षक राहुल वानखडे व रिया ताराम यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका वंदना नारे, सचिव निरज आवंडेकर, प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, समन्वव्यक मो. आसिफ, क्रीडा विभाग प्रमुख स्वप्नील मांदाळे व उप विभागप्रमुख आशिष बेलोकार यांच्यासह शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचार्यांनी ईशिका व गार्गीचे कौतुक केले. या दोघांच्या यशाने अकोला जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्राचे नाव उज्वल केले. त्यामुळे ईशिका व गार्गीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
