अकोला दिव्य न्यूज : अवघ्या दहा वर्षे वयाचा गोंडस व हरहुन्नरी बालकलाकार, बालवक्ता स्वराज दीपाली आतिश सोसे याला तब्बल ४० वर्षांपासून भरविण्यात येणाऱ्या ‘गोकुळाष्टमी विशेष महोत्सवा’ मध्ये ‘उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्कार-२०२५’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. स्थानिक श्रीमती देवकामाई देशमुख सेमी इंग्लिश स्कूलतर्फ, प्रतिष्ठेच्या पुरस्कार समारंभात संस्थापक देवकामाई देशमुख, संस्थाध्यक्ष डॉ. विजय दुतोंडे, साहित्यिक प्रा.सतीश देशमुख, वऱ्हाडी कवी हिंमत ढाळे, प्रा.विजय अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वराज सोसे याला ‘उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्कार-२०२५’देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

आजवर त्याने ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा’, प्रेम, शेतकऱ्याचा मुलगा, तंबाखू नको या लघुचित्रपटांमध्ये तसेच ‘पर्यावरणपूरक दीपोत्सव’ या माहितीपटामध्ये आणि तीन जाहिरातींमध्ये ‘प्रमुख बालकलाकारा’च्या भूमिकेमध्ये प्रसिद्ध कलाकारांसोबत काम करीत त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.आगामी ‘काटा’ या मराठी चित्रपटांमध्ये प्रमुख बालकलाकाराची भूमिका साकारली आहे.
आजवर महाराष्ट्र राज्य, उत्तरप्रदेश राज्य,दिल्ली राज्य तसेच इतरही अनेक राज्यांमध्ये आपल्या अभिनयाने नाट्यछटांद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. स्वराज याला त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यामध्ये भारत सरकारचा राष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार, दिल्ली साठीचे नामांकन, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या टॅलेंट कट्टा, पुणे येथील राष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार, आंतरराष्ट्रीय रिल्स फिल्म फेस्टिवल बालकलाकार पुरस्कार, संभाजीनगर, बालप्रतिभा पुरस्कार, नंदुरबार, डॅडी देशमुख आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल सन्मान, अकोला, बुलढाणा फिल्म सोसायटीचा राष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार, बुलढाणा, आंतरराष्ट्रीय कोच फिल्म फेस्टिवल बालकलाकार पुरस्कार, उत्तरप्रदेश, नवरत्न बालकलाकार पुरस्कार, सांगली, मनमंथन बालकलाकार पुरस्कार, नागपूर, राज्यस्तरीय बालकलावंत पुरस्कार, नाशिक,संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सन्मान, राष्ट्रीय गौरव पुरस्कार, संभाजीनगर, राज्यस्तरीय नक्षत्र चक्र बालकलाकार पुरस्कार,पुणे,शुभम बालकलाकार पुरस्कार, पनवेल,छत्रपती संभाजी राजे कलाभूषण पुरस्कार, अकोला, स्वातंत्र्यसेनानी बापुसाहेब ठाकरे पुरस्कार, दानापूर इत्यादी अनेक पुरस्काराने आजवर सन्मानित करण्यात आले आहे. आजचा हा सन्मान निश्चितच प्रेरणा देणारा असाच आहे,अशी भावना यावेळी बालकलाकार स्वराज याने व्यक्त केली.