अकोला दिव्य न्यूज : प्रजासत्ताक भारताचा ७९ व्या स्वातंत्र्यदिना निमित्त मुर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या विराहीत जिल्हा परिषद शाळेत मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलित आणि वृक्षारोपण करून भारतीय राष्ट्रध्वज वंदन करण्यात आले.सार्थक क्रीडा आरोग्य शिक्षण बहुउद्देशीय संस्था अकोला, प्रेरणा बहुउद्देशीय संस्था अकोला व भीमशक्ती सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेतील वर्ग १ ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते क्रीडा गणेश वाटप करण्यात आले.

तसेच ज्ञानप्रकाश विद्यालय कानडी येथील दहावीच्या परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुण गौरव करून, संविधान व सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कॉग्रेस कमिटी अध्यक्ष अशोक अमानकर होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुर्तिजापूर एसडीओ संदीप कुमार अपार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव व राष्ट्रीय प्रवक्ता अक्षय राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत, यासारख्या आयोजनाची काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले..
कार्यक्रमाला अकोला वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, तहसीलदार डॉ. संतोष येवलेकर, सहायक वनसंरक्षक चेतन राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी पवन जाधव, वखार महामंडळ मुर्तीजापुर साठा अधिक्षक सचिन ढवळे, भीमशक्ती संघटना महाराष्ट्र प्रदेश सचिव मधुसूदन भटकर, महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण कामगार सेना (उबाठा) प्रदेश अध्यक्ष अनिल तायडे, वनपरिक्षेत्र अधिकारी बी.एम.मेश्राम, कानडी केंद्रप्रमुख कैलास सोळुंके, मुख्याध्यापिका लताताई सोळंके, मुख्याध्यापक संघपाल विष्णू भगत, साहेबराव श्रीकृष्ण राऊत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हिम्मतराव राऊत,वन्यजीव आर.एफ.ओ अमित शिंदे, मिलिंद धांडे, अशोक सम्राट प्रतिष्ठान अध्यक्ष प्रा. विजय आठवले, मूर्तिजापूर तालुका काँग्रेस कमिटी ग्रामीण अध्यक्ष राजाभाऊ जोगदंड, श्रीकृष्णा गावंडे, सरपंच पद्माताई भीमराव मनवर, उपसरपंच उषाताई रामेश्वर राऊत, माजी सरपंच शंकर डोंगरे, दादाराव रामटेके दिगंबर चवरे, संघरत्न तुळशीराम कांबळे, सुधाकर श्रीकृष्ण राऊत, मनोज अरुण राऊत, देविदास भाऊराव राऊत, गणेश जगतराम राऊत राऊत, गणेश दामोदर राऊत, संजय उमप, ग्रामसेवक बालाजी बागडे, रामदास पाटील, गणेश रामदास राऊत, कायुमशहा, कादरशहा यांच्यसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पद्माकर वासनिक, अरुणाताई संतोष लबडे, गौतम उमाळे, मिलिंद गावंडे, रोशन राठोड, संतोष लबडे, रवींद्र गेठ यांनी केले. सूत्रसंचालन मंगला अंबादास रडके तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक संघपाल भगत केले.