अकोला दिव्य न्यूज : अकोला-बुलढाणा जिल्हा फोटोग्राफर्स असो. तर्फे जागतिक छायाचित्र दिना निमित्त आज मंगळवार १९ ऑगस्ट रोजी शहरातून कॅमेरा दिंडी काढण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यातच हा उपक्रम अकोला-बुलढाणा छायाचित्रकार संघटनेद्वारा करण्यात येतो. या दिंडीस छायाचित्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

राजेश्वर मंदिरापासून निघालेल्या कॅमेरा दिंडीत राजेश्वराचे पूजन व कॅमेराला सजवून ज्येष्ठ छायाचित्रकार बाजीराव वझे यांचे हस्ते पूजा विधी करून अकोला-बुलडाणा जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र नायसे, उपाध्यक्ष नीरज भांगे, दिग्विजय देशमुख, सचिव नितीन देशमुख, सहसचिव उमेश चाळसे, योगेश उन्होने, महेश इंगळे, हर्षल गढेकर, राहुल ताड़े, विशाल खंडारे, अजय जागीरदार, सारंग वझे, राम शर्मा, संदीप शाहू, पंकज पराते, राज पिम्पले, गणेश खेते, संजय सरकटे, अवि तायड़े, प्रवीण अम्बिलकर, अता कुरेशी, विक्की कलमकार, अनिरुद्ध तराले, दिनेश पिल्ले संजय आगाशे, अरविंद इंगळे, विशाल मानतकर तसेच फोटोग्राफर महिला रेवती भांगे, श्वेता पिम्पले, राधिका खेते, दीपाली चाळसे, स्वाती इंगळे आदींच्या उपस्थितीत पारंपरिक वेषात प्रारंभ झाला.
ही दिंडी जयहिंद चौक, मोठा पूल, शहर कोतवाली, गांधी रोड,
मनपा चौक मार्गे स्वराज्य भवन परिसरात येऊन तेथे पा दिंडीचे समापन करण्यात आले. तसेच जयहिंद चौक, मनपा चौक येथे चहापानी ची व्यवस्था गणेश इलेक्ट्रॉनिक व रितेश मालगे यांनी केली. शानिवार २३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता वाडेगाव रस्तावरील अवनीश कृषि पर्यटन केंद्र येथे जलजल्लोष या कार्यक्रमाचे छायाचित्रकार कुटुंबातील सदस्यासाठी वार्षिक आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन या मध्ये सहयोग लॅब, गणेश इलेक्ट्रॉनिक्स, गुरुकृपा लॅब यांचे सहकार्य लाभले आहे.या कौटुंबिक सोहळ्यात समस्त छायाचित्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.