अकोला दिव्य न्यूज : दि. 23 ऑगस्ट २०१३ रोजी चांद्रयान ३ पासुन विलग आलेले विक्रम लंडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ अलगद उतरले. पाहता पाहता त्यातुन प्रग्यान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभुमीवर भारताचा अमीट ठसा उमटवला. या आधी इस्त्रोने रशियाने बनवलेला 37 उपग्रह एकाच यानने त्यांच्या कक्षांमध्ये स्थापीत करण्याचा विक्रम 104 उपग्रह एकाच यानाने त्यांच्या कक्षेत प्रस्थापीत करून मोडला (कुठे 37 कुठे 104) पहिल्याच प्रयत्नात मंगळयान यशस्वीपणे मंगळा भोवती स्थीर केलं आणि अत्यंत कमी खर्चात. सूर्याचा आभ्यास करणारा स्पेस टेलीस्कोप “आदित्य” आणि येऊ घातलेले गगनयान यामुळे गेली दोन वर्ष संपूर्ण देश हा राष्ट्रीय सण साजरा करण्यात येतो.

अकोला जिल्हयात शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषदेतर्फ विशेष प्रयत्न करून साजरा केला जातो. यामध्ये तीन उपक्रम घेण्याचे ठरले आहे. दोन उपक्रम विद्यार्थ्यांसाठी तर एक उपक्रम शिक्षकांसाठी जास्तीत जास्त सहभाग असावा या उदात्त हेतूने हे उपक्रम दोन स्तरांवर घेण्याचे ठरले आहे. प्रथमस्तर अकोला तालुका ग्रामिण व अकोला शहर असे मिळून आठ तालुके अकोला जिल्ह्यात आहेत. या सगळ्या उपक्रमांतर्गत विज्ञान अध्यापक मंडळाने आयोजनाची जबाबदारी उचलली आहे.
एक उपक्रम आहे पोस्टर बनवण्याचा. आर्यभट ते गगनयान पुरातन ज्ञान व अनंत शक्यता या विषयावर 22×30 inch मापाचं पोस्टर काठायचं आहे. तालुका स्तरावरुन जिल्हास्तरावर पाच पोस्टरची निवड करण्यात येईल, म्हणजे आठ तालुक्यामधुन एकुण चाळीस पोस्टर जिल्हास्तरावर येतील. या चाळीस पोस्टर मधुन 5 सर्वोत्तम पोस्टर्सची निवड जिल्हास्तरावर होईल. हे पाचही विद्यार्थी इस्त्रोच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस स्टेशनला भेट देतील. जेथुन चांद्रयानाचे प्रक्षेपण झालं जेथून मंगळयान दिर्घ प्रवासाला निघालं अशा स्थळाला भेट देतील. तेथिल शास्त्रज्ञांकडून प्रेरणा घेतील आणि उद्याच्या विकसीत भारतासाठी सज्ज होतील. हिच पध्दत दुसऱ्या उपक्रमात राहील. यामध्ये रांगोळीने आर्यभट ते गगनयान पुरातन ज्ञानाने अनंत शक्यता या विषयावर आधारलेली असेल. या कलानिपुण हातांना देखिल श्रीहरीकोटराची भेट बक्षिसात मिळेल.
तिसऱ्या उपक्रमात शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद यांची दुरदृष्टी दिसते. त्यांनी हा उपक्रम शिक्षकांसाठी ठेवला. शिक्षकाचं प्रमुख हत्यार आणखी धारधार करायची शक्कल लढवली आहे. शिक्षकांची व्याख्यान स्पर्धा. यामध्ये गणित वा विज्ञान विषयांचाच हवा हा अट्टाहास न ठेऊन नवीन शैक्षणिक धोरणाला सहजतेने अंगीकारले आहे. शिक्षक पहिल्या वर्गापासून ते १२ वी पर्यंतचा कोणत्याही विषयाचा असला तरी चालेल. त्याला राष्ट्राभिमान हवा. नवं शिकण्याची उर्मी हवी. जे शिकले ते शिकवण्याची ईच्छा हवी. तो शिक्षक वा शिक्षीका विकसीत भारताचे मार्गदर्शन करण्यात समर्थ आहे. मुळ विषयाला धरुन त्या शिक्षक/ शिक्षिकेला 5 मिनीटे बोलायचं आहे. संपूर्ण प्रक्रिया एव्हढी पारदर्शक आहे की मुल्यमापन पध्दती देखिल शिक्षण अधिकाऱ्यांच्या पत्रात नमूद आहे.
त्यानुसार व्याख्यानासाठी मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा संस्कृत भाषा चालेल. मुल्यमापनांसाठी भाषेची शुध्दी 3 गुण, भाषेची समृद्धी 3 गुण, व्याख्यानाचे सादरीकरण 3 गुण व्याख्यानदरम्यान विज्ञानाशी प्रामाणिकता 3 गुण आणि व्यक्त केलेल्या विचारांवर आधारीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे स्पर्धक कशी देतात यावर 3 गुण असे एकुण 15 गुणांवर मुल्यमापन होऊन, यामधून निवडलेल्या पाच शिक्षक मंडळीला विक्रम साराभाईंनी पाहलेल्या स्वप्ननगरीत उपग्रहाला बैलगाडीत न्याव लागेल तरी चालेल पण तो अंतरिक्षात उडेल ही जिद्द निर्माण करणाऱ्या राष्ट्रपती कलामांचे पैलूंनी सतिश धवन सारख्या महान शास्त्रज्ञांकडून घडले अशा श्रीहरीकोट्यावरून उर्जा घेऊन येतील आणि ती शतगुणित करून विद्यार्थ्यांना वाटतील. अश्या उपक्रमाला अकोलेकरांनी भरभरून प्रतिसाद देऊन राष्ट्रीय अंतरीक्ष दिन यशस्वी करावे, असं आवाहन अध्यक्ष नितीन ओक कुतूहल संस्कार केंद्रांचे अध्यक्ष नितीन ओक यांनी केले आहे.