अकोला दिव्य न्यूज : Akola District -Collector -Varsha-Meena.आपल्या मुलाचा अंगणवाडीत प्रवेश घेऊन एक वेगळा आदर्श पालकांसमोर निर्माण करणा-या जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीणा यांची अकोला जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जालना जिल्हा परिषदच्या सीईओ म्हणून कार्यरत वर्षा मीना यांची प्रसुती रजा संपल्यावर त्यांची अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या जागेवर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी तातडीने पदभार स्वीकारावा असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. मावळते जिल्हाधिकारी कुंभार यांना सध्या नवीन नियुक्ती देण्यात आली.

वर्षा मीना या 2018 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. तसेच त्यांचे पतीदेखील IAS अधिकारी असून मीणा यांनी 1 ऑक्टोंबर 2022 रोजी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. तद्नंतर त्या प्रसुती रजेवर होत्या. दरम्यान सीईओपदी असत वर्षा मीना यांनी आपल्या पाल्याला शिक्षणासाठी जालना जिल्हा परिषदेच्या दरेगाव येथील अंगणवाडीत प्रवेश देऊन एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.