अकोला दिव्य न्यूज : अकोला शहरातील अनेक हॉटेल, रेस्टॉरंट आणि स्वीटमार्ट संचालकांच्या विरोधात खोट्या तक्रारी करून खंडणी मागण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा खंडणी बहाद्दरांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अकोला जिल्हा सर्व खाद्यपेय विक्रेता असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे याबाबत अकोला जिल्हाधिकारी, अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक आणि सहाय्यक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन यांना निवेदन देण्यात आले आहे.

शहरात सद्यस्थितीत समाजकंटक व खंडणीबहाद्दर यांनी मिष्ठान्न, नाश्ता व जेवणात विविध प्रकारचे जीवजंतू, बुरशीजन्य वस्तू वा इतर काही मिसळून, याबद्दल तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन या व्यावसायीकांना मोठ्या रकमेची मागणी करण्याचा नवा फंडा सुरू केला आहे. खाद्यपेय विक्रेत्याला त्याच्या दुकानातील खाद्य पदार्थामुळे तब्येत खराब झाली असून आरोग्य बिघडल्याची खोटी तक्रारी अन्न व औषध प्रशासन व पोलिसांकडे करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत आहेत. अन्न व औषधी प्रशासन व काही मीडिया कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता. व्यावसायिकांची अनेक वर्षाची प्रतिष्ठा वेशीवर टांगतात. या सर्व प्रकाराला घाबरून खाद्य व्यावसायिक बळी पडत आहे. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये प्रचंड असंतोष व भीतीचे वातावरण पसरले असून सदर बाबींना आळा घालून या व्यावसायिकांना यापासून सुटका करून द्यावी असे, असे निवेदनात म्हटले आहे.
जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी ताबडतोब कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी अकोला जिल्हा सर्व खाद्यपेय विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष योगेश अग्रवाल, उपाध्यक्ष कृष्णकुमार राठी, ओमप्रकाश गोयंका, रवि घाटे, सचिव दिपक वोरा, सहसचिव भावेश खिलोसीया, केतन शहा, आशिष अग्रवाल, शिव खत्री, अमित केजरीवाल, श्रीराम पांडे, सतीश खत्री,भूषण मेहता, पर्वतभाई चव्हाण, यश मेहता, जयकुमार अग्रवाल, नरेंद्र अग्रवाल शैलेश खत्री, अश्विन खिलोसिया, हेंमेंद्र अग्रवाल, धर्मेंद्र खिलोसिया हिमेश खिलोसिया, संजय सिसोदिया सह संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते.