विद्या भारतीचे आयोजन
अकोला दिव्य न्यूज : गीताचा परिणाम मनावर सरळच होत असतो. देशातील तरुणांच्या ओठावर कोणते गीत आहे, त्यानुसार तरुणांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना कशी आहे हे सांगता येते. म्हणूनच शैक्षणिक क्षेत्रात चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्याच्या मुख्य उद्देशाने विद्या भारती तर्फे स्व. भास्करराव खोत देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

उद्घाटन प्रसंगी मंचावर अध्यक्ष म्हणून मेहरबानू महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. स्मिता शिंगरूप, विद्या भारती विदर्भ प्रांत उपाध्यक्ष सचिन जोशी, अकोला शहर अध्यक्ष मंगेश वानखडे, ताराताई हातवळणे, जिल्हा मंत्री शरद वाघ, पर्यवेक्षक डॉ.प्रा.हर्षवर्धन मानकर, जितेश रापर्तीवर दर्यापूर उपस्थित होते.

या प्रसंगी प्रा.डॉ. स्मिता शिंगरूप यांनी बालवयात शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रभक्तीची बीजं रोवली, तर ती बीजं पुढे जाऊन एक सुंदर, भव्य वृक्षात रूपांतरित होतात. हा वृक्षच पुढे समाजाला, राज्याला आणि अखेरीस आपल्या भारताला उंच शिखरावर नेतो. विद्या भारती अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. तिच्या संस्कारातून घडलेला विद्यार्थी सजग व आदर्श नागरिक बनतो. लहानपणी रुजवलेली राष्ट्रभक्ती त्याला आयुष्यातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्याची ताकद देते. शिक्षक या प्रक्रियेत राष्ट्रनिर्मितीचे महत्त्वाचे कार्य पार पाडतात. म्हणूनच खऱ्या अर्थाने शिक्षक म्हणजेच राष्ट्रनिर्माते.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात योग्य संस्कार रुजवले, तरच उद्या तो विद्यार्थी एक उत्तम, कर्तृत्ववान व देशभक्त नागरिक होईल. शाळेत सिनेमातील गाणी व नृत्य सादरीकरणाची प्रथा थांबवण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनात राष्ट्रभक्तीची बीजं रोवण्याची जबाबदारी शिक्षकांची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज आपण काय देतो, त्यावरच भावी पिढी उभी राहणार आहे, असे त्यांनी नमूद करत सर्व शाळांना या प्रकारापासून दूर राहण्याचे व विद्या भारतीच्या कार्यात सर्वांनी सहभागी होण्याचे प्रा. स्मिता शिंगरूप यांनी आवाहन केले.
समारोप प्रसंगी मंचावर पुरुषोत्तम खोत, ताराताई हातवळणे प्रांत उपाध्यक्ष सचिन जोशी, प्रांत सहमंत्री समीर थोडगे, जिल्हा मंत्री शरद वाघ,ऋषिकेश अढाऊ, सुदेश काळपांडे, किर्ती व कृष्णा खोत पर्यवेक्षक डॉ. प्रा.हर्षवर्धन मानकर, जितेश रापर्तीवर दर्यापूर उपस्थित होते.
स्पर्धात भाग घेणाऱ्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व सहभागी शाळांना व सर्व संगीत शिक्षकांना बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेत बत्तीस शाळांनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन करून संताजी कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी विद्या भारतीच्या सरस्वती वंदनेने झाली. सूत्र संचालन मृणाल कुलकर्णी यांनी केले. तर आभार योगेश मल्लेकर यांनी मानले. स्पर्धेच्या पर्यवेक्षक म्हणून शिवाजी महाविद्यालयाचे डॉ. हर्षवर्धन मानकर व प्रबोधन विद्यालय, दर्यापूरचे जितेश रापार्तीवार उपस्थित होते.
या कार्यक्रमाला विद्या भारतीचे सागर तिवारी, अमृतेश अग्रवाल, मृणाल कुलकर्णी, आकांक्षा देशमुख, अंजली अग्निहोत्री, स्मिता जोशी, आसावरी देशपांडे, जय राणे, प्रांत सहमंत्री समीर थोडगे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
समूह गीत गायन स्पर्धा तीन गटात घेण्यात आली.
गट – अ
प्रथम – प्रभात किड्स स्कूल
द्वितीय – स्कूल ऑफ स्कॉलर्स, बिर्ला
तृतीय – विवेकानंद इंग्लिश प्रायमरी स्कूल
गट – ब
प्रथम – श्री समर्थ पब्लिक स्कूल, रिधोरा
द्वितीय – प्रभात किड्स स्कूल
तृतीय – विवेकानंद इंग्लिश प्रायमरी स्कूल
गट – क
प्रथम – आर.डी. जी. पब्लिक स्कूल
द्वितीय – प्रभात किड्स स्कूल
तृतीय – स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ, तेल्हारा