अकोला दिव्य न्यूज : प्रभात किड्स स्कूलची प्राजक्ता पांडे हिने सीबीएसई ज्युदो साउथ झोन-2 या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये प्राजक्ता पांडेने उत्कृष्ट यश प्राप्त केल्याने तिची सीबीएसई राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा गुणांचा विकास व्हावा या उद्देशाने संगमनेर येथील लोटस इंग्लिश मिडियम स्कूल येथे झालेल्या सीबीएसई ज्युदो साउथ झोन -2 या स्पर्धेमध्ये 17 वर्ष वयोगटात प्रभातची प्राजक्ता पांडे हिने 40 किलो वजनगटात प्रथम क्रमांक मिळविला. प्राजक्ता पांडे या ज्युदोपटूला प्रभातचे प्रशिक्षक किरण बुंदेले व अनिल कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका सौ. वंदना नारे, सचिव निरज आवंडेकर, प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, समन्वयक मो. आसिफ व क्रीडा विभाग प्रमुख स्वप्निल मांदाळे व उप विभागप्रमुख आशिष बेलोकार यांच्यासह शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचार्यांनी प्राजक्ताचे कौतुक केले. व राजस्थान येथील केसरी सिंगपूर येथे होणार्या राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.