• अत्यल्प किंमतीत हजारो रुपयांच्या चाचण्यांची सुवर्णसंधी
अकोला दिव्य न्यूज : शिक्षणासोबत सामाजिक व आरोग्यविषयक कार्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या श्री समर्थ शिक्षण समूहाच्या वतीने संस्थेच्या रौप्यमहोत्सवीर्षानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या शृंखलेत २५ ऑगस्टपासून संपूर्ण शरीर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन श्री समर्थ आयुर्वेद मेडिकल कॉलेज व रुग्णालय, अकोला येथे पार पडणार असल्याची माहिती श्री समर्थ शिक्षण समूहाचे अध्यक्ष प्रा. नितीन बाठे यांनी दिली.

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मधुमेह, हृदयविकार, थायरॉईड, लठ्ठपणा, व्हिटॅमिन व खनिजांच्या कमतरता यांसारखे आजार वेगाने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर वेळोवेळी संपूर्ण शरीर तपासणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. लक्षणे दिसण्यापूर्वी आजार ओळखल्यास उपचार अधिक प्रभावी होतात.नागरिकांपर्यंत हाच संदेश पोहोचवण्यासाठी हे शिबिर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील अन्नपूर्णा माता मंदिराजवळ असलेल्या श्री समर्थ आयर्वेद मेडिकल कॉलेज व रुग्णालयात २५ ऑगस्टपासून २५ दिवस हे तपासणी शिबिर होईल, असे ते म्हणाले.

या शिबिरादरम्यान या शिबिरात पुढील महत्त्वाच्या तपासण्या अत्यल्प खर्चात करण्यात येतील. फास्टिंग व पोस्टमील शुगर टेस्ट (मधुमेह तपासणीसाठी), कम्प्लीट ब्लड काउंट (CBC रक्तातील घटकांचे परीक्षण), लिपिड प्रोफाइल (हृदयविकाराचा धोका ओळखण्यासाठी), लिव्हर फंक्शन टेस्ट (यकृत कार्यक्षमतेसाठी), थायरॉईड टेस्ट (हार्मोनल संतुलन तपासणीसाठी), युरिक असिड टेस्ट (संधिवात व गाऊटसाठी), कॅल्शियम डिफिशियन्सी टेस्ट (हाडांचे आरोग्य तपासणीसाठी), व्हिटॅमिन B12 (– न्यूरोलॉजिकल व रक्ताशी संबंधित समस्या शोधण्यासाठी), व्हिटॅमिन D3 (हाडे व रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी) या सर्व चाचण्या केवळ १४९९ रुपयांत करण्यात येतील.
आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.
शिक्षण संस्थेने सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून रौप्यमहोत्सवात नागरिकांसाठी उपयुक्त अशा उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. या तपासण्या सामान्यतः महागड्या असतात, पण त्या सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्यात. नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, हेच आवाहन आहे.आयुर्वेद फक्त उपचारपद्धती नसून, आरोग्य टिकवण्याची जीवनशैली आहे. शिबिराद्वारे नियमित तपासणीसह आरोग्याबाबत नागरिकांना योग्य मार्गदर्शन देण्यात येणार आहे. भविष्यात अशा उपक्रमांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न असेल. शिबिरातून केवळ तपासण्या होणार नाहीत, तर नागरिकांना आहार, जीवनशैली व रोगप्रतिबंधक उपाय याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे. केवळ आजार ओळखण्यापुरते मर्यादित न राहता, आजार होण्यापूर्वीच त्याची प्रतिबंधात्मक जाणीव होईल, असे प्रा. बाठे यांनी सांगितले.
श्री समर्थ शिक्षण समूहाने रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य तपासणी व्यतिरिक्त अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामध्ये वृक्षारोपण मोहिमा, रक्तदान शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा आणि ग्रामीण भागात आरोग्य जनजागृती मोहीमा यांचा समावेश आहे, अशी माहिती प्रा. नितीन बाठे यांनी दिली.
नागरिकांना या संधीचा लाभ मिळावा यासाठी शहरातील विविध भागात रक्तनमुना संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
श्री अन्नपूर्णा माता मंदिराजवळील भागासाठी श्री समर्थ आयुर्वेदिक कॉलेज आणि रुग्णालयात सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत रक्तनमुना देता येईल. यासाठी 9834234847 या क्रमांकावर संपर्क साधावा.
रणपिसे नगर आणि परिसरातील नागरिक श्री समर्थ कोचिंग क्लासेस, १२ ज्योतिर्लिंग मंदिराजवळ सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत रक्तनमुना देऊ शकतील. यासाठी 9307526755 या क्रमांकावर संपर्क साधावा.
गोरक्षण रोड आणि परिसरातील नागरिकांसाठी श्री समर्थ बिझी बीज जवळ रक्तनमुना संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिक सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत येथे रक्तनमुना देऊ शकतील.
वयोवृद्धांसाठी ‘होम कलेक्शन’ची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी 9307524170 या क्रमांकावर संपर्क साधावा.
नागरिकांनी तपासणीच्या दिवशी सकाळी काहीही न खाता यावे, असे आयोजकांनी कळविले आहे.