अकोला दिव्य न्यूज : इंटरनॅशनल टाइम्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत अकोला येथील वीरा विक्रम जानोरकर हिने भरत नाट्यम् स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड बनवून सुवर्णपदक जिंकले आहे. तिच्या या कामगिरीबद्दल जागृत हनुमान संस्था उदेगांव कुंभारी येथे तिचा सत्कार करण्यात आला. वास्तु शोभा कन्स्ट्रक्शनचे संचालक संदीप महल्ले पाटील व जयदीप महल्ले पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पाटील समाजाचे अध्यक्ष अशोकराव अमानकर, उपाध्यक्ष विनायकराव शेळके, सचिव प्रदीप खाडे, कोषाध्यक्ष राजेंद्र मोहोकार उपस्थित होते.

तामिळनाडू मधील चेन्नई नजीक सालेम येथे श्री शिवाय रुद्रण नाट्यालय कैलास मानसरोवर स्कूल येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेत वीराने भाग घेऊन ही स्पर्धा प्रथम क्रमांकाने जिंकली. तिने २७ मिनिटे ३१ सेकंद एवढ्या कालावधीचे सलग नृत्य करून सर्वाधिक काळ नृत्य करण्याची ही स्पर्धा जिंकली. संपूर्ण भारतातून सुमारे 2000 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

वीरा ही स्थानिक प्रभात किड्स स्कूल मध्ये दहाव्या वर्गात शिकत आहे. या कार्यक्रमात अविनाश देशमुख, पोलीस निरीक्षक मनोज केदारे, संदीप महल्ले, जयदीप महल्ले, विक्रम जानोरकर, राजेश मते, विनायकराव पवार, निशिकांत बडगे, सुनील जानोरकर, विजय बोरकर, सरपंच सतीश फाले, विठ्ठलराव गाढे, संतोष गावंडे, अविनाश नाकट, दिनकरराव सरप, मधुकरराव महल्ले, घनश्याम दांदळे, दिलीप भाल तिलक, आशिष कसले, श्रीकांत भुईभार, शरद पांडे, प्रकाश चतरकर व इतरही गणमान्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन विकास पल्हाडे यांनी केले.
