Saturday, August 30, 2025
HomeUncategorizedअकोल्यात पहिल्यांदा 'राष्ट्रीय अंतरिक्ष दिन' ! यशासाठी चिकित्सक वृत्ती आवश्यक- शिक्षणाधिकारी (योजना)...

अकोल्यात पहिल्यांदा ‘राष्ट्रीय अंतरिक्ष दिन’ ! यशासाठी चिकित्सक वृत्ती आवश्यक- शिक्षणाधिकारी (योजना) झापे

अकोला दिव्य न्यूज : राज्य विज्ञान शिक्षण संस्था,नागपूर, अकोला जिल्हा परिषद, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, कुतूहल संस्कार केंद्र अकोला व ब्राह्मण सभा अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा 23 ऑगस्ट रोजी ‘राष्ट्रीय अंतरिक्ष दिन’ डॉ. अरविंद मोहरे यांचे मार्गदर्शनात उत्साहाने साजरा करण्यात आला. त्यानिमित्य शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रेरक जिल्हास्तरीय स्पर्धा 23 ऑगस्ट रोजी ‘बाल शिवाजी शाळा,अकोला ‘येथे संपन्न झाल्या.

भारताने वैज्ञानिक प्रगती करून अंतरिक्ष क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व शिक्षकांसाठी तीन विशेष उपक्रम हाती घेण्यात आले होते. याची पूर्व तयारी म्हणून प्रथम सर्व तालुकास्तरावर पोस्टर्स स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व शिक्षकांसाठी वक्तृत्व स्पर्धा 21 ऑगस्ट 2025 पर्यंत आयोजित करण्यात आली.

यामध्ये यश प्राप्त केलेल्या पहिल्या पाच स्पर्धकांची जिल्हास्तरावर अंतिम फेरी घेण्यात आली. याचे आयोजन जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेमध्ये करण्यात आले यावेळी उद्घाटक म्हणून अकोला जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (योजना) संजयकुमार झापे, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक मोहन गद्रे सचिव ब्राह्मण सभा अकोला तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. राजकुमार अवसरे वरिष्ठ प्राध्यापक राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर नागपूर , डॉ. नितीन ओक माजी नासा एज्युकेटर तर प्रमुख अतिथी म्हणून गजानन पारधी उपशिक्षणाधिकारी योजना, प्रमोद टेकाडे , जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक, दिनेश दुतंडे , गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बाळापूर, श्रीमती सुनिता बकाल गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती तेल्हारा ,ब्राह्मण सभा सदस्य डॉक्टर महेंद्र ताम्हणे, डॉ. मेंडकी, मोहिनी मोडक हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

संजयकुमार झापे व डॉ. राजकुमार अवसरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी चांद्रयान तीन मोहिमे अंतर्गत विक्रम लँडर चंद्राच्या अशा पृष्ठभागावर उतरले जो आपण पृथ्वीवरून कधीच पाहू शकणार नाही ज्या ठिकाणी चंद्र स्पर्श झाला त्याला शिवशक्ती नाव दिल्या गेले , यशासाठी चिकित्सक वृत्ती अत्यावश्यक आहे असे मनोगत उद्घाटन पर भाषणात संजयकुमार झापे यांनी व्यक्त केले.

डॉ. मेंडकी यांनी मार्गदर्शन करताना बाल शिवाजी शाळेच्या नियोजन, सादरीकरण आणि येथील संस्कारांवर भाष्य केले, तर VVM स्पर्धेमध्ये भारतातून द्वितीय क्रमांक प्राप्त करणारा बाल शिवाजी शाळेचा अर्णव भांबेरे याने आपले मनोगत व्यक्त करत आपला VVM चा प्रवास सांगितला. प्रमोद टेकाडे यांनी शिक्षण क्षेत्रातली शिक्षकाची महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली. अवसरे यांनी 23 ऑगस्टचे महत्व सांगत ‘अंतरिक्ष दिन’ साजरा करण्याचे प्रयोजन सांगितले.

दरवर्षी या दिवसासाठी वेगळी थीम असते यावर्षी आर्यभट्ट ते गगनयान: पूर्वापार ज्ञान ते अनंत शक्यता ही थीम ठरवण्यात आली. यावेळेस स्पर्धेचे महत्त्व सांगताना त्यांनी प्रधानमंत्री मोदींचे भाषण, स्पेस स्टेशन निर्माण करण्याची त्यांची दूरदृष्टी या संदर्भातला व्हिडिओ दाखवून मार्गदर्शन केले. यावेळेस त्यांनी व्हीव्हीएम आणि इन्स्पायर मानक यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा यासाठीही आवाहन केले. त्यानंतर तालुकास्तरावर यश प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांची स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये रांगोळी स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा व शिक्षकांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

यामध्ये रांगोळी स्पर्धेमध्ये विजेते ठरलेले स्पर्धक आहेत, अनुष्का देशमुख (आदर्श जुनियर कॉलेज, अकोला) गिरीजा दळवी (बाल शिवाजी माध्यमिक शाळा, अकोला) शर्वरी पुडाखे (सेंटपॉल अकॅडमी, तेल्हारा) प्रियल खारोडे (सेंटपॉल अकॅडमी, तेल्हारा) मिताली सपकाळ (महारुद्र हायस्कूल, अकोट) तर पोस्टर्स स्पर्धेमध्ये अर्णव भांबेरे (बाल शिवाजी माध्यमिक शाळा, अकोला) भक्ती लखोटीया (सेंटपॉल अकॅडमी, तेल्हारा) 3)कांचन टापरे (सहदेवराव भोपुळे विद्यालय) 4)अनुष्का देशमुख (आदर्श ज्युनिअर कॉलेज, अकोला) 5)आचल सुरवाडे (शहाबाबू उर्दू हायस्कूल, पातुर) यांनी विजेते पद प्राप्त केले आहे.


बहुतेक वेळा विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेतल्या जातात पण यावेळेस शिक्षकांना सुद्धा सहभाग घेण्याची संधी होती आणि या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला. यामध्ये विजेते ठरलेले शिक्षक आहेत, वक्तृत्व स्पर्धा : पूर्वा सोमण, शितल थोडगे, विजय पजई,प्रमोद भाकरे, निर्मला राऊत या सर्वांचे प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आले. तसेच विजेत्या स्पर्धकांना इस्रोला नि: शुल्क भेट देण्यात येणार आहे. असे ओक सर यांनी प्रतिपादन केले.
अशा उत्साहपूर्ण वातावरणात अंतरिक्ष दिनाचा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विजेत्या स्पर्धकांचे मनापासून कौतुक केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रवींद्र भास्कर यांनी तर आभार प्रदर्शन दिनेश दुतंडे यांनी केले. सूत्रसंचालन आशा भास्कर व स्वाती बापट यांनी केले .कार्यक्रम यशस्वीते करता विज्ञान अध्यापक मंडळाचे पदाधिकारी, कुतूहल संस्कार केंद्राचे पदाधिकारी व बाल शिवाजी माध्यमिक शाळेचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. अशी माहिती डॉ. अरविंद मोहरे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!