अकोला दिव्य न्यूज : Gajanan Maharajs 115th Death Anniversary Concluded In Shegaon With 462 Devotees Participating Sud : संतनगरी शेगाव येथील गजानन महाराज संस्थान, शेगांव येथे गजानन महाराज यांच्या ११५ व्या पुण्यतिथी उत्सवाची आज गुरुवारी २८ ऑगस्ट रोजी थाटात सांगता झाली. २४ ते २८ ऑगस्ट दरम्यान यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी ४६२ दिंड्यासह हजारो भाविकांची मांदियाळी जमली होती. यावर्षी पुण्यतिथी उत्सवात श्रींचे सेवेत ४६२ दिंड्यांनी सहभाग घेतला. यापैकी नियमांची पूर्तता केलेल्या एकूण ७३ नविन दिंड्यांना १० टाळ, १ विणा, १ मृदंग, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत असे संत वाङ्मय आणि श्री माऊली पताका वितरीत करण्यात आल्या.

जुन्या दिंड्यांना भजनी साहित्य दुरूस्तीकरीता सानुग्रह अंशदान व इतर व्यवस्थेकरीता सहयोग देण्यात आला. तसेच उत्सवानिमित्य आलेल्या भजनी दिंड्यांमधील वारकऱ्यांची भोजनप्रसादाची व्यवस्था तसेच प्रथमोपचार केंद्राची सुविधा विसावा संकूल येथे करण्यात आली.

सात शाखात लाखावार भविकांना महाप्रसाद“तसेच उत्सव काळात शेगांवसह शाखा पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंपासरोवर, ओंकारेश्वर, गिरडा या शाखांवर श्रींचा समाधि उत्सव साजरा करण्यात आला. १लाख १८ हजारावर भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. शेगाव संस्थान तर्फेही माहिती देण्यात आली.

धन्य आज दिन संत दर्शनाचा
श्री संत गजानन महाराजांचा ११५ वा पुण्यतिथी उत्सव निमित्ताने श्रींचे शेगाव संस्थानच्या वतीने २७, २८ ऑगस्ट असे दोन दिवस श्रींचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात आले. या ऊप्परही श्रींच्या समाधी दर्शनासाठी आज गुरुवारी ३ तास तर श्रीमुख दर्शनासाठी २० मिनिटे लागली.बुधवार, गुरुवार या दोन दिवसांत एक लाखाहून अधिक भाविकांनी श्रींच्या समाधी, व श्रीमुख दर्शन घेतले.

पालखी परिक्रमा
दरम्यान आज दुपारी ४ वाजता श्रींच्या मंदिरातून श्रीं ची पालखी नगर परिक्रमा साठी निघाली. अश्व, पताकाधारी, टाळकरी, वारकरी, रथ, मेणा, व भजनी दिंड्या यात सहभागी झाल्या.सायंकाळी श्री संत गजानन महाराज मंदिरात आरती करण्यात आली.

काल्याचे कीर्तन
२९ ऑगस्ट रोजी ह.भ.प. प्रमोद बुवा राहाणे यांचे सकाळी ६ ते ७ काल्याचे कीर्तन होईल. नंतर दहीहंडी गोपाळकाला कार्यक्रमाने या उत्सवाची सांगता होणार आहे. या उत्सवात दरारोज सकाळी ६ ते ६.४५ काकडा, ७.१५ ते ९.१५ गाथा भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५.३० ते ६ हरिपाठ व रात्री ८ ते १० श्रीहरी कीर्तन पार पडले झाले.
