अकोला दिव्य न्यूज : BJP friend parties conflict काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील भाजपाचे काही मित्रपक्ष चर्चेसाठी दिल्लीत पोहोचले. मात्र, या बैठकीत सत्ताधारी पक्षाचे प्रमुख नेते अनुपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. त्याच्या एका आठवड्यानंतर भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या निषाद पार्टीचे प्रमुख आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री संजय निषाद यांनी भाजपाला थेट आव्हान दिले आहे. त्यांनी भाजपाला चक्क युती तोडण्याचे आव्हान दिले आहे. नेमका वाद काय? भाजपावर मित्रपक्ष नाराज का आहे? उत्तरप्रदेशमधील भाजपाचे मित्रपक्ष युती तोडतील का? जाणून घेऊयात…

निषाद पार्टीच्या प्रमुखांनी भाजपा नेत्यांवर काय आरोप केले?
संजय निषाद म्हणाले, “मित्रपक्षांमुळे कोणताही फायदा होत नाही असं जर भाजपाला वाटत असेल, तर त्यांनी ही युती संपवावी.” सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संजय निषाद यांनी ही टीका केल्यानंतर त्याच रात्री भाजपाचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी यांनी त्यांना फोन केला आणि दोन्ही पक्षांमधील मतभेद लवकरच सोडवले जातील असे आश्वासन दिले. गोरखपूरमध्ये बोलताना संजय निषाद म्हणाले, जर आमच्याबरोबर युती केल्याचा त्यांना काही फायदा होत नसेल, तर त्यांनी ती तोडून टाकावी; मला हे भाजपाला सांगायचे आहे. आमच्यावर घाणेरड्या भाषेत टीका करण्यासाठी ते लहान-सहान नेत्यांची मदत का घेत आहेत?
दिल्लीतील कार्यक्रमात मित्रपक्षांनी त्यांच्या समुदायांसाठीची आरक्षणाची मागणी पूर्ण न झाल्यास उत्तर प्रदेश विधानसभेला घेराव घालण्याचा इशारा दिला होता. याच मागणीला उत्तर प्रदेशमधील आणखी एक मंत्री आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे नेते ओम प्रकाश राजभर यांनीही पाठिंबा दिला होता. निषाद पार्टीच्या नेत्यांनी सांगितलं की, भाजपाच्या लहान मित्रपक्षांमध्ये नाराजीची भावना वाढत आहे. या मित्रपक्षांमध्ये मध्य आणि पूर्व उत्तर प्रदेशातील निषाद, राजभर, पटेल आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट समुदाय यांचा समावेश आहे. त्यांच्या मनात अशी भावना आहे की, भाजपा दूरगामी विचार करून त्यांच्या स्वतःच्या नेतृत्वाची ओबीसी (इतर मागासवर्गीय) समुदायांमध्ये बांधणी करत आहे. ओबीसी हा या लहान पक्ष्यांचा मुख्य मतदार आहे.
भाजपाच्या जय प्रकाश निषाद आणि साध्वी निरंजन ज्योती यांच्यासारख्या नेत्यांनी केलेल्या टीकेमुळे निषाद पार्टीच्या शंकांना आणखी बळकटी मिळाली आहे. निषाद समाजाचा मुख्य मतदार गट म्हणजे नदीकाठच्या कोळी आणि नावाडी समाजातील लोक आहेत. या समाजात आणि त्यांच्या उपजातींचा राज्यातील १५० हून अधिक विधानसभा मतदारसंघांमध्ये महत्त्वपूर्ण प्रभाव आहे. निषाद पार्टीच्या एका नेत्याने सांगितले, परिस्थिती अशी आहे की, विरोधकांपेक्षा भाजपामधील निषाद नेतेच आम्हाला जास्त लक्ष्य करत आहेत. समाजवादी पार्टीमध्ये अनेक निषाद नेते आहेत, जसे की खासदार रामभुआल निषाद, आमदार राजपाल कश्यप आणि काजल निषाद. पण, यापैकी कोणताही नेता समुदायाच्या मुद्द्यांवर आम्हाला थेट लक्ष्य करत नाही, त्याऐवजी भाजपाचे नेते जसे की जय प्रकाश निषाद, साध्वी निरंजन ज्योती आणि राज्यसभा खासदार बाबू राम निषाद यांनी आम्हाला लक्ष्य केले आहे.”
ते पुढे म्हणाले, “जे. पी. निषाद आमच्यावर सातत्याने टीका करत आहेत. अलीकडेच साध्वी निरंजन ज्योती म्हणाल्या की, आम्ही नद्यांची विक्री करत आहोत. हा एक चुकीचा आरोप आहे. आधी फक्त काही लोकांना २०० किलोमीटर नदीचा भाग मासेमारीसाठी लीजवर मिळत होता. लहान मासेमारांनाही त्याचा लाभ मिळावा म्हणून सरकारने लीजची अट ५ ते ८ किलोमीटरपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला, यामुळे या नेत्यांना त्रास होत आहे.” संजय निषाद यांच्या टीकेनंतर भूपेंद्र चौधरी यांच्या व्यतिरिक्त भाजपाचे प्रदेश सरचिटणीस (संघटन) धर्मपाल सिंह गोरखपूरमध्ये एका प्रादेशिक पक्षाच्या बैठकीसाठी आले होते, त्यांनीही निषाद यांच्याशी संपर्क साधला.ते पुढे म्हणाले, “जे. पी. निषाद आमच्यावर सातत्याने टीका करत आहेत. अलीकडेच साध्वी निरंजन ज्योती म्हणाल्या की, आम्ही नद्यांची विक्री करत आहोत. हा एक चुकीचा आरोप आहे. आधी फक्त काही लोकांना २०० किलोमीटर नदीचा भाग मासेमारीसाठी लीजवर मिळत होता. लहान मासेमारांनाही त्याचा लाभ मिळावा म्हणून सरकारने लीजची अट ५ ते ८ किलोमीटरपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला, यामुळे या नेत्यांना त्रास होत आहे.” संजय निषाद यांच्या टीकेनंतर भूपेंद्र चौधरी यांच्या व्यतिरिक्त भाजपाचे प्रदेश सरचिटणीस (संघटन) धर्मपाल सिंह गोरखपूरमध्ये एका प्रादेशिक पक्षाच्या बैठकीसाठी आले होते, त्यांनीही निषाद यांच्याशी संपर्क साधला.
भाजपाची प्रतिक्रिया काय?
भूपेंद्र चौधरी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “त्यांच्या काही समस्यांबद्दल आम्हाला माध्यमांद्वारे माहिती मिळाली आणि आम्ही त्यांच्याशी बोललो. आम्ही त्यांच्या समस्यांवर उपाय शोधणार आहोत. आमचा पक्ष खूप शिस्तबद्ध आहे. त्यांचे जयप्रकाश निषाद यांच्याशी काही वाद होते, पण आम्ही खात्री देतो की आमच्या पक्षाच्या कोणत्याही नेत्याचा आमच्या मित्रपक्षांच्या कोणत्याही नेत्याचा अनादर करण्याचा कोणताही हेतू नाही. जे काही बोलले गेले आहे ते वैयक्तिक आहे आणि पक्षाचा त्या विधानांशी काहीही संबंध नाही.