अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्र राज्य तेली समाज समन्वय समितीचे राज्याध्यक्ष प्रा. प्रकाश डवले यांनी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याहस्ते मुक्तागिरी, मुंबई येथे झालेल्या या समारंभात शिवसेनेत प्रवेश केला. अमरावती विभाग शिवसेना उपनेते व अकोला जिल्ह्याचे संपर्क नेते माजी आमदार गोपिकिशन बाजोरिया यांच्या उपस्थितीत एका वार्ताहर बैठकीत त्यांच्या प्रवेशाची घोषणा करण्यात आली.

अकोला अनेक वर्षांपासून शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत प्रा. प्रकाश डवले सामान्य माणसांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या कार्यपद्धतीला पुढे नेत, विविध योजनांच्या माध्यमातून राज्यात क्रांती घडवत आहेत. या विचारसरणीशी प्रेरित होऊनच शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे प्रा. डवले यांनी सांगितले. प्रा. डवले यांच्या प्रवेशामुळे या समाजकारणाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना यावेळी जिल्हा प्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी व नारायणराव गव्हाणकर यांनी व्यक्त केली.
स्थानिक शासकीय विश्रामगृहामध्ये पार पडलेल्या पत्रपरिषदेला माजी आमदार गोपिकिशन बाजोरिया, जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, संतोष अनासने, उषाताई विरक, अतुल एडणे, चेतन थामेद, अमोल ढोकणे, गोपाल नागापुरे, रवी भामरे, गजानन बोराळे, विजया राजपूत, दिपाली जाधव, अँड. दिपाली जानोरकर उपस्थित होते.
शिक्षकांच्या समस्या असोत की सामाजिक प्रश्नांवर प्रा. प्रकाश डवले यांनी नेहमीच आवाज उठवला असून, अकोला जिल्ह्यातील शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी त्यांचे यापूर्वी मोठे योगदान राहिले आहे. प्रकाश डवले यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील शिवसेना संघटनाला नवे बळ मिळेल असा विश्वास अमरावती विभाग शिवसेना उपनेते व अकोला जिल्हा संपर्क नेते आणि माजी आमदार गोपीकिसन बाजोरिया यांनी व्यक्त केला.