अकोला दिव्य न्यूज : गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ ब्रिटिशांविरुद्ध लोकांमधील एकजूट वाढवण्यासाठी व सामाजिक जागृतीसाठी जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली. तेव्हा अकोला शहरात बोटावर मोजता येतील इतकेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ होते आणि त्यापैकी एक म्हणजे, आजपासून 95 वर्षांपूर्वी मोर्णा नदीकाठावरील रहिवासी वसाहतीमध्ये स्थापन करण्यात आलेले श्री मारवाडी मित्र गणेशोत्सव मंडळ !

जुलमी राजवट उलथून टाकण्यासाठी लोकांमधील एकजूटता वाढविण्यासोबत सामाजिक जागृतीसाठीच खाजगी धार्मिक विधीतून बाहेर पडून गणेश उत्सव हा सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून पुनरुज्जीवित करण्याचा मोहिमेत सामील होण्यासाठी आजच्या शालिनी टॉकीज (आता बंद आहे) मागील वसाहत व परिसरातील मोहनलाल शर्मा, श्रीकिसन लढ्ढा, डॉ.टी केशवराज, प्रभुदयाल औंदानिया, तेजपाल मिश्रा, मदनलाल जोशी, शंकरलाल भारूका, देवकरण लढ्ढा,चंदूलाल कागलीवाल, तुलसीराम सारडा, रामगोपाल हेडा आणि प्रभुतींनी एकत्रित येऊन 1931 मध्ये श्री मारवाडी मित्र गणेशोत्सव मंडळ स्थापना केले.

आज 95 वर्षाचा टप्पा पार केलेल्या या मंडळाने सार्वजनिक बघता बघता सार्वजनिक गणेशोत्सवाला एका मोठ्या जनचळवळीत रूपांतरित केले. ब्रिटिशांविरुद्ध उसळत्या जनक्षोभात लोकांची एकजुट वाढविण्यास मग दरवर्षी 10 दिवसात राष्ट्रभक्त आणि राष्ट्र नायकांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती देण्यासाठी सजीव देखावे सादर केले जाऊ लागले. राष्ट्राभिमानासाठी प्रखर वक्त्यांचे उद्बोधन आणि समाजसुधारकांचे प्रवचन घेतल्या जात. हळूहळू काळानुरूप समाजातील अनिष्ट प्रथा व रूढी परंपरावर कुठाराघात करणारे उत्कृष्ट देखावे/ जिंवत झांकी आणि त्यावरील थोर पुरुषांच्या विचार सत्र आयोजित केले जाऊ लागले. दरवर्षी 10 दिवस येथे भक्ती आणि भक्तांचा महापुर ओसंडून वाहत होता. श्री मारवाडी मित्र गणेशोत्सव मंडळाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. मात्र आजगत आपलं सामाजिक भान हरपू दिले नाही.

देशाभिमुख व समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या मंडळाच्या या कार्यात शहरातील गुलाबचंद सारडा, चुन्नीलाल रांदड, शालिनी नाट्यगृहाचे दादासाहेब सुर्यवंशी दरवर्षी सढळ हाताने मदत करून प्रोत्साहन देऊ लागल्याने दरवर्षी नवनवीन प्रयोग व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कलाकृती सादर केल्या जात. प्रत्येक देखावा मनात रुंजी घालत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सादर झांकी वा देखावे पाहण्यासाठी लोकांची रात्री उशिरापर्यंत रीघ लागलेली राहत. सर्वसामान्यांना कुतुहलाने बघत तर अनेकांना चमत्कारच वाटत. अशातच
श्री मारवाडी मित्र गणेशोत्सव मंडळाने 1966 रोजी सादर केलेला एक सजीव देखाव्याला बघताना गणेशभक्तांसह अकोलेकरांचे मन हेलावून डोळ्यात चक्क अश्रूंचे थेंब येतं. महत्वाचे म्हणजे याबाबत माहिती कानावर आली तेव्हा तत्कालीन अकोला जिल्हाधिकारी स्वतः या ठिकाणी आले तो देखावा बघितल्यावर अचंबित झाले. अंत्यसंस्कारात अग्नी प्रज्वलित होतो. हे बघून त्यांना अप्रुप वाटल. त्यांना जेव्हा हे कसं केले जाते, हे सांगण्यात आले तेव्हा प्रशंसासाठी शब्द नसावे ! हा देखावा तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या अंत्यसंस्काराचा होता. तत्कालीन पंतप्रधान शास्त्री यांच ११ जानेवारी १९६६ रोजी निधनानंतर तब्बल ८ महिन्यानंतर हा देखावा सादर केला होता आणि तो बघायला येथे गर्दी ओसंडून वाहत होती. त्याकाळात राष्ट्रनायकाबद्दल किती प्रेम व सन्मान होता, हे यावरून लक्षात येते.
एका पिढीकडून आलेला हा वारसा दुसऱ्या पिढीने त्याचं उद्देशाने पुढे नेताना त्यात भरच घातली. काळाच्या ओघात परंपरा लुप्त होऊ न देता, कालिया मर्दन, भक्त प्रल्हाद, ताब्यातून गंगा प्रवाह, नागकन्या,संतांची जलसमाधी, कृष्ण दिला या आणि यासह सामाजिक एकता आणि एकात्मता घट्ट करणारे देखावे/झांकी सोबतच अंधश्रद्धा निर्मूलनासाठी चिंधींतून साप, हवेत बाबा, मॅजिक आणि इतर उद्बोधक विचारांचा प्रचार व प्रसारासाठी गणेशोत्सवाला एक सशक्त माध्यम करण्यासाठी जादूगर दासबाबू चावडा, भिकूलाल दिनोडिया, रामदास जवादे, कमल सारड, कैलास भारूका, अशोक शर्मा, सुरेश मिश्रा, रतन सारडा, राजेंद्र जोशी, परमानंद जानोरकार,देवानंद जानोरकार, आणि वसंत लढ्ढा आणि इतरांनी आता हा वसा तिसऱ्या पिढीला सोपविला आहे. आज या मंडळाचे कार्य तिसऱ्या पिढीकडे सोडविताना, दुसऱ्या पिढीने ज्या निष्ठेने वाडवडिलांनी दिलेल्या परंपरेचं निर्वाहन करीत मंडळाचे नांव लौकिक केले तेच ही नवीन पिढी पुढे नेईल, यात दुमत नाही कारण या परंपरेला विघ्नहर्ता गणरायाचे आशिर्वाद आहेत.
विशेष सूचना : सदरची माहिती ही अकोला दिव्य मराठी न्यूज वेबसाइटच्या पुर्व परवानगी शिवाय कोठे ही, कोणत्याही माध्यमातून प्रकाशित केल्यास @ copy Right अतंर्गत गुन्हा ठरतो.