अकोला दिव्य न्यूज : डाॅ.सौरभ सुभाष गादीया आणि डॉ. कल्याणी मळसने गादिया या दांपत्याने सुरू केलेल्या आय आरोग्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन डॉ.सौरभ गादिया यांचे आजोबा डॉ.सुरजमल बोरा यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
यावेळी अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण, विधान परिषद सदस्य वसंत खंडेलवाल, माजी मंत्री अजहर हुसैन आणि महाराष्ट्र ऑप्थॅलमिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शिरीष थोरात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

नेत्ररोग तज्ञ, रेटीना आणि फेको सर्जन डॉ. सौरभ गादिया आणि शिशू नेत्रतज्ञ, फेको आणि तिरळेपणा सर्जन डॉ. कल्याणी मळसने गादीया यांनी जवाहरनगर रोडवरील फ्रुलाटो मिल्क शेकच्यावर, अक्सीस बॅंकेसमोर सर्व अत्याधुनिक सुविधांनी युक्त डोळ्यांचे रुग्णालय सुरू केले आहे.या रूग्णालयात नेत्र रोगांच्या संबंधित सर्व उपचारांची सुसज्ज सुविधा उपलब्ध आहे.
डाॅ. सौरभ गादीया यांनी मुंबई येथील टीएनएमसी व बीवायएनएल नायर रुग्णालय गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पदवी प्राप्त केली असून कर्नाटकातील ख्यातनाम शंकरा आय हॉस्पिटल येथून नेत्र विज्ञानातील डीएनबी हे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. याशिवाय त्यांनी हुबळी येथील विख्यात एम.एम. जोशी आय इन्स्टिट्युट मधून विट्रियो रेटीना फेलोशीप पूर्ण केली आहे.
डाॅ.कल्याणी मळसने गादीया यांनी मुंबई येथील एलटीएमएमसी सायन या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी प्राप्त केली असून पुणे येथील ख्यातनाम एच.व्ही. देसाई आय इन्स्टिट्युट येथून नेत्र विज्ञानातील डीएनबी ही पदव्युत्तर डिग्री प्राप्त केली आहे.याशिवाय त्यांनी हुबळी येथील विख्यात एम.एम.जोशी आय इन्स्टिट्युट येथून पिडियाट्रिक नेत्र विज्ञान आणि स्ट्रेबिस्मोलाॅजी ही फेलोशिप पूर्ण केली आहे .
आय आरोग्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्याला वैद्यकीय व्यवसायी, व्यापारी- उद्योजक, विविध राजकीय पक्षांचे नेते, पत्रकार आणि गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.