अकोला दिव्य न्यूज : अकोला शहरातील एकाच कुटुंबातील लोकांनी संगनमताने सोन्याच्या व्यवहारातून एका महिलेची तब्बल १ कोटी ९० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. पैशांची मागणी केल्यावर महिलेसह त्यांच्या मुलीला जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणात हिमेश दिलीप पोरवाल, प्रतीक्षा दिलीप पोरवाल, अनिता दिलीप पोरवाल, मुन्ना खंडेलवाल, यश साखरिया, सांची साखरिया, शुभम खंडेलवाल व हिमेश पोरवाल याची आत्या (नाव माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. वर्ष २०२० मध्ये दिवंगत सोनार दिलीप पोरवाल यांचा मुलगा हिमेश पोरवाल यांच्याशी फिर्यादीची ओळख झाली. सोन्याचे व्यवहार, तसेच मुंबईत अडकलेले सोने सोडवण्यासाठी आर्थिक मदत करण्याच्या बहाण्याने हिमेशने फिर्यादीकडून वेळोवेळी पैशांची मागणी केली. फिर्यादी आणि त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींनी रोकड तसेच गहाण ठेवलेले दागिने मिळून एकूण १ कोटी ९० लाख रुपयांची मदत केली, असे फिर्यादीत नमूद आहे. त्या बदल्यात काही धनादेश दिले गेले; मात्र नंतर व्यवहार पूर्ण न करता संशयित आरोपी गायब झाला.
दरम्यान, ६ जुलै रोजी फिर्यादीने पैसे आणि दागिन्यांची मागणी करण्यासाठी संशयित आरोपींच्या घरी भेट दिली असता, हिमेश पोरवाल, त्याची पत्नी प्रतीक्षा, आई अनिता, बहीण सांची, सासरे मुन्ना खंडेलवाल, दाजी यश साखरिया व नातेवाईक शुभम खंडेलवाल यांनी एकत्र येऊन फिर्यादी आणि त्यांच्या मुलीवर हल्ला केला. त्यांनी फिर्यादींना मारहाण केली, गळा दाबण्याचा प्रयत्न केला, मुलीच्या कानातील दागिने हिसकावले. तसेच, जातीवाचक शिवीगाळ करत ‘तुम्हाला संपवायला वेळ लागणार नाही, आमचे मोठ्या राजकारण्यांशी संबंध आहेत, पोलिस आमचे काही करू शकत नाहीत’ अशी धमकी दिली.
या हल्ल्यानंतर फिर्यादीने मानसिक तणावामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपचारानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस अधिक तपास करत आहेत.
८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीन पैसे आणि दागिन्यांची मागणी करण्यासाठी संशयित आरोर्पीच्या घरी भेट दिली असता, हिमेश पोरवाल, त्याची पत्नी प्रतीक्षा, आई अनिता, बहीण सांची, सासरे मुन्ना खंडेलवाल, दाजी यश साखरिया व नातेवाईक शुभम खंडेलवाल यांनी एकत्र येऊन फिर्यादी आणि त्यांच्या मुलीवर हल्ला केला.