Tuesday, September 2, 2025
HomeUncategorizedजिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांचा सेवा हमी आयुक्तांनी केला सत्कार

जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांचा सेवा हमी आयुक्तांनी केला सत्कार

अकोला दिव्य न्यूज : सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीला १० वर्षे पूर्ण झाली असून राज्याच्या 33 विभागामार्फत १०२७ सेवा ऑनलाईन आपले सरकार पोर्टल वरून दिल्या जात आहेत. इंटरनेट व आपले सरकार मोबाईल अँपवरून नागरिकांना या सेवांचा लाभ घरबसल्या घेता येतो. आतापर्यंत १८.७७ कोटी अर्जाद्वारे नागरिकांनी या सेवांचा लाभ घेतला. असे प्रतिपादन अमरावती विभागीय सेवा हमी आयुक्त डॉ. एन. रामबाबु यांनी केले.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त्य अमरावती येथे अमरावती विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयामार्फत आयोजित “सहकार विभाग कार्य विषयक मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.
मागील वर्षात सहकार विभागात सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणारे डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अकोला यांना प्रमाणपत्र देवून डॉ. एन. रामबाबु, यांनी गौरव केला. तसेच सहकार विभागातील कर्मचारी शशिकांत नरवाडे, गणेश भारस्कर, अनिल मनवर यांचा सत्कार करण्यात आला.
सहकारी संस्थांची नोंदणी करणे , सहकारी संस्थाची उपविधी दुरुस्ती करणे, नवीन सावकारी परवाना देणे, सावकारी परवान्याचे नुतानिकरन करणे, मानीवअभी हस्तांतरण करणे या पाच सेवा सहकार विभागामार्फत सरकार पोर्टल वरून देण्यात येत आहेत.
या एकदिवसीय प्रशिक्षणामध्ये सावकारी अधिनियम व सावकारी प्रकरणांमध्ये कर्तव्याची कार्यवाही, दिवाणी न्यायालयाचे अधिकार, सेवा हक्क कायद्याअंतर्गत सेवांबाबतचे मार्गदर्शन, तणाव व्यवस्थापन, कार्यालयीन संवाद कौशल्ये यांसारख्या अत्यंत उपयुक्त आणि प्रत्यक्ष कार्यात मार्गदर्शक ठरणाऱ्या विषयांचा मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी गौतम वर्धन, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती, नानासाहेब चव्हाण जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ, डॉ. महेंद्र चव्हाण जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलढाणा, गितेशचंद्र साबळे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, वाशीम, विभागीय उपनिबंधक चैतन्य नासरे व अमरावती विभागातील सर्व सहाय्यक निबंधक, सहकार अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!