अकोला दिव्य न्यूज : प्रभात चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष आणि डॉ गजानन नारे सर यांचे वडील साहेबराव बाजीराव नारे यांचे आज बुधवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी पहाटे आकस्मिक निधन झाले.मृत्यू समयी त्यांचं वय ८६ वर्ष होते.त्यांच्या मागे मुलगा गजानन नारे, सून आणि नातवंडासह मोठा आप्तेष्ट नातेवाईक आणि मित्रमंडळी आहे. त्यांच्या अंतिम इच्छेप्रमाणे त्यांचा पार्थिव देह अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला सुपुर्द करण्यात येणार आहे.

अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील विटाळी सावरगाव येथील मुळ रहिवासी साहेबराव नारे शिक्षक होते. आपल्या नैतिक मूल्यांनी आणि शिस्तबद्ध जीवनाने त्यांनी अनेकांना घडविले. सेवानिवृत्तच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी शिक्षण व या क्षेत्राचे पावित्र्य जपले. सेवानिवृत्त नंतर अकोला येथे स्थायिक झाले. त्यांच्यामुळे गजानन नारे यांनी अकोल्याच्या शिक्षण क्षेत्राला नवीन आयाम मिळवून दिला. साहेबराव नारे यांचे पार्थिव आज दुपारी १२ वाजता अकोला मेडिकला सोपविण्यात येणार आहे. तोपर्यंत अंतिम दर्शनासाठी पार्थिव देह प्रभात किड्स, तोष्णीवाल लेआउट आहे. यापुर्व त्यांच्या पत्नीचाह देहदान केले.