- अकोला दिव्य न्यूज : पातुर तालुक्यातील पिंपळखुटा येथे दररोज ८ तास ३ फेज वीज दिली जाते, मात्र त्यातील ५-६ तास फॉल्टमुळे लाईन बंद असते. उर्वरित वेळ सिंगल फेजवर कमी व्होल्टेजमुळे उपकरणे सुरू राहत नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कायमस्वरूपी ३ फेज वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करत वीज समस्यांमुळे हैराण झालेल्या संतप्त ग्रामस्थांनी अकोला येथील महावितरण ग्रामीण कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर आज बुधवारी मोर्चा काढला.

दररोज ८ तास ३ फेज वीज दिली जाते, मात्र त्यातील ५-६ तास फॉल्टमुळे लाईन बंद असते. उर्वरित वेळ सिंगल फेजवर कमी व्होल्टेजमुळे उपकरणे सुरू राहत नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कायमस्वरूपी ३ फेज वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी गावातील सामाजिक कार्यकर्ते संदीप कवळे यांच्या नेतृत्वात काढलेल्या मोर्चात ग्रामस्थांनी केली.
- गावातील वाढत्या वीज वापरामुळे नवीन डीपी बसवावी, लोडशेडिंग बंद करावे. झाडांची वाढ लक्षात घेता विद्युत तारांना होणाऱ्या अडथळ्यांमुळे झाडांची तातडीने तोडणी करावी, ही मागणी पूर्ण न झाल्यास शेकडो ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांचा मोर्चा महावितरण कार्यालयावर काढण्यात येईल कसा इशारा दिला. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. असे संदीप कवळे यांनी सांगितले.

पातूरच्या पिंपळखुटा येथील ग्रामस्थांनी मोर्चाद्वारे कायमस्वरूपी ३ फेज वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी केली दरम्यान यावर महावितरणाच्या उपविभागीय कार्यालय बाळापूर यांना सूचना दिली असून लवकरच ग्रामस्थांची समस्या सोडवण्यात येईल तक्रार प्राप्त होतात आम्ही त्यावर लवकर कारवाई करतो ही सुद्धा तशीच लवकर कारवाई करून ग्रामस्थांना सोयी उपलब्ध करून देण्यात येतील. गोरखनाथ सपकाळे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण अकोला.