Thursday, September 4, 2025
HomeUncategorizedअकोल्यात अवतरले हिंगोलीतील 'मोदकाचा गणपती' म्हणून प्रसिद्ध अविघ्नहर्ता 'चिंतामणी'

अकोल्यात अवतरले हिंगोलीतील ‘मोदकाचा गणपती’ म्हणून प्रसिद्ध अविघ्नहर्ता ‘चिंतामणी’

अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्रात ‘मोदकाचा गणपती’ म्हणून प्रसिद्ध असलेला गणपती म्हणजे विघ्नहर्ता चिंतामणी गणपती. मोदकाचा गणपती हे भाविक-मानसिकतेचे प्रतीक असून गणेशाला मोदक अर्पण करण्याच्या परंपरेशी जोडलेल्या हिंगोली येथील ‘मोदक गणपती’ ची प्रतिकृती यंदा अकोला शहरात साकारण्यात आली आहे. जवळपास ९५ वर्षांपासून देशभरात भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणेश मूर्तीची स्थापनाकरून आपल्या आगळ्या वेगळ्या देखावे/झांकी, सजावट आणि उपक्रमासाठी नावलौकिक श्री मारवाडी मित्र गणेशोत्सव मंडळाने यंदा मराठवाड्यातील हिंगोली शहरातील प्राचीन आणि गणपती ‘मोदकाचा गणपती’ म्हणून ओळखला असलेल्या विघ्नहर्ता चिंतामणी गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली आहे.

दरवर्षी अनंत चतुर्दशीला हिंगोली येथील या विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात.गणेशाला मोदक अर्पण करून नवस बोलतात आणि त्या नवसाच्या पूर्ततेसाठी मोठ्या संख्येने मोदक वाटप करण्याची परंपरा आहे. मोदक हा गणपतीचा सर्वात प्रिय पदार्थ मानला जातो, त्यामुळे गणेशाला मोदक अर्पण करणे हे एक शुभ मानले जाते. ही बाब लक्षात घेऊन हिंगोली शहरातील या गणेश मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती तयार करून यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे सर्वसहमतीने ठरले आणि आतापर्यंत हजारो भाविकांनी येथे येऊन दर्शनाचा लाभ घेतला असून उद्या शुक्रवार ६ सप्टेंबर हा उत्सवाचा शेवटचा दिवस आहे.

श्री मारवाडी मित्र गणेशोत्सव मंडळाच्या दुसऱ्या पिढीकडून मिळालेला वारसा तिसऱ्या पिढीतील वसंत लढ्ढा, योगेश शर्मा, अजय झाले, संकेत जानोरकार, अमोल इंगळे, सागर भारूका, संजय अग्रवाल, गजेंद्र मिश्रा, राजकुमार हेडा, संदिप जोशी, आशिष गावंडे, नरेश साहू, रामाचल सोनी, बबलू ढोले, कृष्णकुमार शर्मा व श्रीनाथ परिवार समर्थपणे चालवत, आपल्या नवनवीन विचारांनी दरवर्षी गणेशोत्सव साजरा करीत मंडळाच्या नावलौकिक वाढवत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!