Sunday, September 7, 2025
HomeUncategorizedअमोल मिटकरींचा U टर्न ! IPS अंजली कृष्णा प्रकरणी दिलगीरी व्यक्त केली

अमोल मिटकरींचा U टर्न ! IPS अंजली कृष्णा प्रकरणी दिलगीरी व्यक्त केली

अकोला दिव्य न्यूज :Amol Mitkari vs IPS Anjali Krishna Viral Video : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला दम दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद उफाळून आला आहे. तसेच, विरोधकांनी अजित पवारांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अवैध उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला तिच्या कर्तव्यापासून रोखण्यासाठी अजित पवारांनी दमबाजी केली. त्यानंतर अजित पवारांवर टीका सुरू झाल्यानंतर त्यांच्या पक्षाचे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) आमदार अमोल मिटकरी यांनी थेट या महिला अधिकाऱ्याच्या नियुक्तीत घोळ झाल्याचा संशय व्यक्त केला होता.

मिटकरी यांनी थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाला पत्र पाठवलं होतं. मिटकरींनी अंजना कृष्णा यांची थेट पूज खेडकरशी तुलना केली होती. ते म्हणाले होते की खेडकरप्रमाणे अंजना कृष्णा यांनी देखील कागदपत्रांमध्ये घोळ केला असावा. मात्र, आता मिटकरी यांनी त्यांच्या भूमिकेपासून यू-टर्न घेतला आहे.

मिटकरी नेमकं काय म्हणाले होते?
ज्या राज्यात आपली नियुक्ती झाली, त्या राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर नेते व महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींची सविस्तर माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी घेणे अपेक्षित आहे. ज्या अधिकाऱ्यांना ही माहिती नसेल त्यांच्या कागदपत्रांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने पडताळणी करावी. एका आयपीएस अधिकाऱ्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री कोण, हे कळत नसेल तर ते त्यांच्या शिक्षणाचे दुर्दैव म्हणावे का?, पुजा खेडकर यांच्याप्रमाणे अंजना कृष्णा यांची नियुक्ती देखील बनावट कागदपत्रांद्वारे झाली आहे का?” असा संशय मिटकरी यांनी व्यक्त करून त्यांच्या चौकशीची मागणी केली होती.

दरम्यान, आता मिटकरी यांनी त्यांचं मत बदललं आहे. याप्रकरणी त्यांनी दिलगीरी देखील व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी मांडलेली भूमिका ही त्यांची वैयक्तिक होती, त्यांच्या पक्षाचा या भूमिकेशी काहीही संबंध नसल्याचं मिटकरींनी म्हटलं आहे.

अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली दिलगीरी
अमोल मिटकरी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “सोलापूर घटनेसंदर्भात केलेलं ट्वीट मी बिनशर्त मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करतो. ही माझ्या पक्षाची भूमिका नव्हती तर माझी वैयक्तिक भूमिका होती. आपले पोलीस दल व प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमतआहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!