अकोला दिव्य न्यूज : दक्षिण मध्य रेल्वेच्या अनुषंगाने अकोला आणि अकोट रेल्वे प्लॅटफॉर्मवरील समस्या, मुलभूत सुविधांचा अभाव यासोबतच अनेक मार्गावर नवीन गाड्या सुरू करणे, त्यासाठी पिट लाईनचे काम प्रस्तावित करणे, काही गाड्यांच्या फेऱ्या वाढविणे, या आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध करून प्रवासी व व्यावसायिकांचा प्रवास सुकर होईल आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होईल, अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर अँड. एस.एस.ठाकूर यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय सल्लागार समितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा घडवून आणली. विभागीय व्यवस्थापकांनी प्रत्येक मुद्दावर सविस्तर माहिती देऊन, अनेक मुद्दे लवकरच मार्गी लागतील.तर अन्य कामांसाठी कार्यवाही प्रस्तावित करण्याची ग्वाही दिली. इतर कामात येणाऱ्या अडचणी सभेत सांगितल्या.

साऊथ सेंट्रल रेल्वे विभागाच्या नांदेड विभागीय कार्यालयात शुक्रवार १२ सप्टेंबरला झालेल्या सल्लागार समितीच्या बैठकीत अँड. ठाकूर यांनी सविस्तर पत्र देऊन चर्चा केली. पत्रात नमूद मुद्द्यानुसार अकोला स्थानकावरून रेल्वे गाडी सुरू करण्यासाठी पिट लाईन साठी आवश्यक तांत्रिक बाबींची पुर्तता व पुढे काय झाले यावर औरंगाबाद येथे पिटलाइन पूर्ण झाल्यानंतर, अकोला येथील प्रस्तावाची व्यवहार्यता तपासली जाईल, असं सांगण्यात आले. यासोबतच अकोला-शिवणी स्टेशनवर कंटेनर सुविधेच्या आवश्यकतेचा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठवून पाठपुरावा करू तर शिवनी शिवापूर स्टेशनवर गुड्स शेड विकासाचे काम सुरू आहे.

उन्हाळी व पावसाळी हंगाम लक्षात घेता प्लॅटफॉर्म क्रमांक ४, ५ व ६ च्या संपूर्ण प्लॅटफॉर्मला कव्हर करण्यासाठी प्लॅन हेड-५३०० अंतर्गत एक नवीन काम प्रस्तावित केले जाईल. तर अकोला स्थानकासाठी स्टेशन साफसफाईचा करार मध्य रेल्वेचा आहे. यामुळे दक्षिण मध्य रेल्वेचे अकोला रेल्वे स्थानकावरील ४ व ५ या दोन्ही दक्षिण मध्य रेल्वेच्या फलकाची साफसफाई मध्य रेल्वे पाहते.प्लॅटफॉर्म क्रमांक ६ साठीची साफसफाईची देखभाल संबंधित स्टेशन मास्टर बघतात. तरीही सदर क्षेत्राची स्वच्छता सुधारण्यासाठी दोन्ही अधिकाऱ्यांना कळवले जाईल. अशी माहिती यावेळी देण्यात आली.
अकोला तिरुपती आणि इतर गाड्यांच्या डब्यांची स्थिती दर्शविण्यास निर्देशक आवश्यक आहेत.अकोला स्थानकावरून प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर जाणाऱ्या सर्व गाड्यांच्या आगमन आणि निर्गमनाचे निर्देशक आवश्यक आहेत. यावर स्थानकांच्या एनएसजी श्रेणीनुसार प्रवाशांच्या सुविधा पुरविल्या जातात.असे सांगितले.
अकोट स्थानकावर भारतातील सर्व रेल्वे स्थानकांना तिकिटे देण्याची सुविधा नाही, त्यामुळे हैदराबाद, नांदेड, जयपूर, दिल्ली, नागपूर, मुंबई येथील प्रवाशांची गैरसोय होत आहे.अकोट रेल्वे स्थानकाच्या मागील उत्पन्नाच्या नोंदी लक्षात घेता, सर्वस्थानकांसाठी तिकीट आणि आरक्षण खिडकी असणे आवश्यक आहे. तेव्हा अकोट स्थानकावर आरक्षण तिकिटे देण्याची तरतूद विचाराधीन असल्याचे सांगितले.
अकोट स्थानकावर आर.पी.एफ. आणि जी.आर.एफ. नसल्यामुळे, असामाजिक घटकांनी गैरसोय करून स्थानकाच्या संपूर्ण परिसरात कब्जा केला आहे, त्यामुळे प्रवाशांना सुविधांचा वापर करता येत नाही, म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती तरतूद करावी आणि तिकिटे नसलेल्या व्यक्तींची संख्या वाढल्याने उत्पन्न कमी होऊ शकते, म्हणून आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे अँड. ठाकूर यांनी सांगितले. तेव्हा या प्रकरणी मुख्यालयाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
पूर्णा बायपासचा प्रकल्प प्रलंबित ठेवण्यात आला आहे. अकोला मार्गे नांदेड कुर्ला ही रेल्वे गाडी TOD म्हणून धावत होती. मात्र प्रवाशांची संख्या अत्यल्प असल्याने ती बंद करण्यात आली आहे. नांदेड ते संभलपूर ही गाडी एका दिवसासाठी हिंगोली, अकोला आणि नागपूर मार्गे वळवता येईल. यामुळे ७ तासांचा वेळ वाचेल आणि ३०० किमी अंतर कमी होईल. त्यामुळे ती अधिक सोयीस्कर आणि खर्च वाचवता येईल.असा मुद्दा अँड ठाकूर यांनी उपस्थित केला. तेव्हा संभलपूर – नांदेड – संभलपूर एक्सप्रेसचे वळण हे धोरणात्मक बाब आहे जे पूर्व किनारपट्टी रेल्वेवरील रेल्वे बोर्ड आणि संभलपूर रेल्वे विभागाशी संबंधित आहे.अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
०७०५३/०७०५४ काचीगुडा बिकानेर ही गाडी आठवड्यातून धावते, वाहतुकीचा विचार करता, तिची वारंवारता दररोज नियमितपणे वाढवता येईल. मात्र काचीगुडा बिकानेर काचीगुडा टीओडी स्पेशलची वारंवारता वाढवणे हे हैदराबाद विभागाशी संबंधित आहे.
नागपूर ते संभाजी नगर अशी इंटरसिटी एक्सप्रेस. या मार्गावर दररोज किमान तीन वेळा वाहतूक करून साप्ताहिक गाड्यांची वारंवारता वाढवता येईल. बसमत हिंगोली, वाशिम येथील लोकांना फायदा होईल म्हणजेच नांदेड-गंगानगर, काचीगुडा अकोला इंटरसिटी, नांदेड-गंगानगर, हैदराबाद-अजमेर गाड्यांच्या वारंवारता वाढवण्याचा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.असं उत्तर या मुद्यावर देण्यात आले.
अकोला पूर्णा, अकोला-परळी, सिकंदराबाद-जयपूर, हैदराबाद अजमेर या मार्गाकडे लक्ष द्यावे, असं पत्रात नमूद केले होते. त्यावर अकोला ते नांदेड दरम्यान २ दैनिक एक्सप्रेस, १४ नॉन-डेली एक्सप्रेस गाड्या जोडणी प्रदान करतात. आयआरटीटीसी २०२४-२५ मध्ये प्रस्ताव आधीच प्रस्तावित केला गेला आहे. अशी माहिती बैठकीत देण्यात आली.