Tuesday, September 16, 2025
HomeUncategorizedचित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक विभागाच्या विदर्भ अध्यक्षपदी सचिन गिरी

चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक विभागाच्या विदर्भ अध्यक्षपदी सचिन गिरी

अकोला दिव्य न्यूज : विदर्भातील नाट्य, साहित्य आणि संस्कृतिक क्षेत्रातील ख्यातनाम आणि पश्चिम विदर्भ आणि अकोला शहरातील चिरपरिचित व्यक्तीमत्व असलेले सचिन विजय गिरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक विभागाच्या विदर्भ विभाग अध्यक्षपदावर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शॉर्ट फिल्म स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभात चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक विभागाच्या विदर्भ अध्यक्ष म्हणून नियुक्ती पत्र देऊन सचिन विजय गिरी यांच्या अभिनंदन केले.

पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तळागाळापर्यंत पोहोचून पक्षाची प्रतिमा व शक्ती वाढवण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे व पक्षाचा स्वाभिमानी विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आणि त्यातून पक्षाचे संघटन मोठ्या प्रमाणावर वाढविण्याच्या साठी शुभेच्छा दिल्यात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!