Saturday, August 30, 2025
HomeUncategorizedअकोल्यात एकात्मतेचे प्रतीक आणि १३५ वर्षांचा इतिहास असलेला मानाचा श्री बाराभाई गणपती

अकोल्यात एकात्मतेचे प्रतीक आणि १३५ वर्षांचा इतिहास असलेला मानाचा श्री बाराभाई गणपती

अकोला दिव्य न्यूज : shri Barabhai Ganpati Akola Tradition 135 years Css : विदर्भातील काही जुन्या गणेशोत्सव मंडळांनी आणि घराण्यांनी तेवढ्याच श्रद्धेने व भक्तिभावाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा जोपासली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घराण्यांच्या उत्सवाने आता शतके ओलांडली आहेत. मात्र, त्यांच्याकडील गणेशाची मूर्ती, त्यामागच्या कलाकारांचे हात आजही ती परंपरा जतन करून आहेत. अकोल्यातील जुने शहरात जयहिंद चौकातील १३५ हून अधिक वर्षांचा इतिहास असलेला मानाचा श्री बाराभाई गणपती विदर्भासह संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. या गणपतीची प्राचीन परंपरा नाथ कुटुंबीय व अकोलेकरांनी भक्तिभावाने जपली असून श्री बाराभाई गणपती अकोल्यात एकात्मतेचे प्रतीक आहे.

Oplus_0

श्री बाराभाई गणपती अकोला शहरातील गणेशोत्सवाचे एक आगळे-वेगळे आकर्षणाचं. वऱ्हाडातील सर्वात पारंपरिक गणपती म्हणून श्री बाराभाई गणपतीचा नावलौकिक आहे. या गणपतीची स्थापना नेमकी केव्हापासून झाली, याची कोणतीही नोंद नाही. या गणपतीचा पेशवे कालिन बाराभाईच्या कारस्थानाशी निकट संबंध असावा म्हणूनच याला बाराभाई हे नाव प्राप्त झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. प्राचीन काळी श्री बाराभाई गणपतीची रुढी-परंपरेने स्थापना केल्या जात होती. मात्र, कालांतराने गणेशोत्सवातील सार्वजनिक उत्साह कमी झाला व ही परंपरा संपुष्टात येऊ नये म्हणून संस्थापक अध्यक्ष कै.भगवाननाथ इंगळे यांनी आपल्या घरी श्री बाराभाई गणपतीची स्थापना केली. तेव्हापासून श्री बाराभाई गणपती संपूर्णत: नाथ कुटुंबाचा आहे.

श्री बाराभाई गणपतीची परंपरा नाथ कुटुंबियांनी गेल्या अनेक वर्षांपासून जोपासली. या गणपतीला मानाचे स्थान प्राप्त होऊन आज १३५ वर्ष लोटली आहेत. लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्यानंतर इंग्रजकालीन परिस्थतीतही अकोल्यातून कै.भगवाननाथ इंगळे यांनी श्री बाराभाई गणपतीसह शहरातील सात-आठ मंडळांची मिरवणूक काढली होती. तेव्हापासून अकोल्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत पहिल्या स्थानावर श्री बाराभाई गणपती पालखीत असतो. अकोल्यात ही प्रथा १८९० च्या सुमारास सुरू झाली. या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक दिंड्या असतात.
श्री बाराभाई गणपतीची पालखी वाहणारे भोईराज सुद्धा पिढ्यांपिढ्या आपली सेवा गणेश चरणी अर्पण करीत आहेत. अनेक वर्षांपासून असलेल्या या गणपतीचे अकोलेकरांच्या मनात श्रद्धेचे भाव आहेत. श्री बाराभाई गणपतीला अनेक जण नवस बोलतात, साकडे घालतात. भक्तांच्या श्रद्धेला आणि विश्वासाला श्री बाराभाई गणपतीने कधीही तडा जाऊ दिला नाही, असे मोठ्या अभिमानाने नाथ कुटुंबीय सांगतात.

शंभरहून अधिक वर्षांपासून एकच मूर्ती
श्री बाराभाई गणपतीची मूर्ती गेल्या शंभर वर्षाहून अधिक वर्षांपासून एकच आहे. या अगोदर जुन्या पिढीतील मूर्तीकार ओंकारराव मोरे ठाकूर हे गणपतीची मूर्ती तयार करीत होते. त्यांच्या मृत्यूनंतर वारंवार प्रयत्न करूनही श्री बाराभाई गणेशाची मूर्ती तयार करण्यात यश आले नाही. त्यामुळे ही मानाची मुर्ती विसर्जित करण्यात येत नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!