Saturday, August 30, 2025
HomeUncategorizedवाशीम जिल्ह्यात जनजीवन ठप्प ! शेतात पाणीच पाणी : अनेक भागांचा संपर्क...

वाशीम जिल्ह्यात जनजीवन ठप्प ! शेतात पाणीच पाणी : अनेक भागांचा संपर्क तुटला

अकोला दिव्य न्यूज : वाशीम जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून मुसळधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. पूर आल्याने अनेक मार्गावर वाहतूक ठप्प झाली. जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. अतिवृष्टीमुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने खरीप हंगामातील पिके पाण्यात गेल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्याला पुढील पाच दिवस मुंबई वेधशाळेने ‘यलो अलर्ट’ दिला आहे.

संग्रहित छायाचित्र

मानोरा तालुक्यातील पारवा येथे ढगफुटी सदृश पाऊस झाला. अरुणावती नदीला पूर आला आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसासोबतच वादळी वारा देखील सुटला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. वीज यंत्रणेवर वृक्ष पडल्यामुळे विविध भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. कारंजा शहरात विजेच्या खांबावर वृक्ष कोसळले होते.

वाशीम जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाली. खरीप हंगामातील पिकांना त्याचा मोठा फटका बसला. शेतांमध्ये पावसाचे प्रचंड पाणी साचले. त्याचा परिणाम पिकांवर झाला. पिकांवर विविध रोगराई येत आहे. सोयाबीन, तूर, कापूस, हळद, भाजीपाला, फळबाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बळीराजा खचून गेला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. पंचनाम्याच्या प्रक्रियेत सुद्धा पावसाचा अडथळा येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!