अकोला दिव्य न्यूज मुर्तिजापूर : स्पर्धा परीक्षा ही एक संधी आहे, तिचे सोने करा.अभ्यास, वेळेचे नियोजन, सराव या बाबी महत्त्वाच्या आहेत. राज्य सेवा, बॅंका रेल्वे, निवड मंडळ, निम सहकारी क्षेत्रात भरपूर पदे असतात. कुशल अकुशल कामगारांची गरज असते. रोजगाराचे प्रमुख तीन प्रकार असून,शासकीय क्षेत्र, निमशासकीय व स्वंयरोजगार असे हे प्रकार आहेत. असे प्रा.डॉ. नरेश बनसोड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

श्री.गाडगे महाराज महाविद्यालय मुर्तिजापूर येथे करिअर कट्टा कार्यक्रमात ते बोलत होते. अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करिअर कट्टा कार्यक्रमाची सुरुवात गाडगे बाबा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.मनिषा यादव होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.अनिल ठाकरे प्रा. डॉ. राजकन्या खनखने तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ.नरेश बनसोड उपस्थित होते. सर्वांचे पुष्पगुच्छ देवून विद्यार्थ्यांनी स्वागत केले.
प्रास्ताविकात प्रा. डॉ.अर्चना गायकवाड यांनी मुलांना स्पर्धापरीक्षा ,स्वयंरोजगार ही पुढील काळाची गरज आहे. ती पूर्ण करण्यासाठी करिअर कट्टा आयोजित केला आहे. प्रा. राजकन्या खणखणे यांनी जेली बनविणे, विविध लोणचे, सॉस, वेगवेगळ्या प्रकारचे पापड तसेच दागदागिने बनविणे असे विविध रोजगार असल्याची माहिती दिली. प्रा.अनिल ठाकरे यांनी ऑनलाईन सेवेमधील संधीची माहिती दिली. अध्यक्ष प्रा डॉ.मनिषा यादव यांनी मुलांना माहितीचे अनुकरण करावे असे आवाहन करून संधी ही पुन्हा पुन्हा मिळत नसते. कष्ट आणि जिद्द हवी तेव्हा ध्येय प्राप्त होते.असे सांगितले.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा.विजय बेलखेडे. प्रा.एस. शामसुंदर, डॉ.कांचन मिसाळ, डॉ तायडे प्रा. भारती बाजड, प्रा.राजेंद्र वाकडे, प्रा.सुप्रिया इंगोले, प्रा.श्रीया तांबडे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. संचालन अभिनव सिरसाट तर आभारप्रदर्शन राधा गिरी या विद्यार्थिनीने मानले.