अकोला दिव्य न्यूज : जीएसटी परिषदेच्या 56 व्या बैठकीत सर्वसामान्यांना दिलासा देणारा अतिशय मोलाचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत जीएसटीचे दोन स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. जीएसटीचे 12 आणि 28 टक्के स्लॅब आता पूर्णपणे रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे आता केवळ 5 आणि 18 टक्के स्लॅब जीएसटी राहणार आहे. तसेच लक्झरी वस्तूंवर विशेष 40 टक्के जीएसटी स्लॅब लावण्यात येणार आहे. पण सर्वसामान्य, गरीब नागरिकांच्या जीवनाश्यक अशा वस्तूंवरील कर आता खूप कमी होणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. निर्मला सीतारामन यांनी बैठकीनंतर याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता देशात कोणकोणत्या वस्तू स्वस्त आणि महाग होणार याची माहिती थोडक्यात जाणून घेऊया.
काय महाग, काय स्वस्त?
सुखा मेवा, बदाम, काजू, पिस्ता, खजूर, मिक्स मेवा या वस्तूंवर याआधी 12 टक्के जीएसटी लागायची. पण आता या वस्तूंवर केवळ 5 टक्के जीएसटी लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रोसेस्ड फूड जसे की पास्ता, नूडल्स, नूडल्स, कॉर्नफ्लेक्स, फ्रूटेड राइस, बिस्किट, केक, पेस्ट्री, पिज्जा ब्रेड, रोटी, चपाती, खाखरा, नमकीन, भुजिया, मिक्सचर या वस्तूंवर आधी 12 टक्के जीएसटी लागायचा. पण आता या वस्तूंवर केवळ 5 टक्के जीएसटी लागणार आहे.
पॅकेज्ड पेय जसे की नारळाचं पाणी, सोया मिल्क ड्रिंक, फ्रूट जूस आधारित ड्रिंक, दुधापासून तयार झालेले पेय यांच्यावर आतापर्यंत 12 टक्के जीएसटी लागत होतं. पण आता या वस्तूंवर केवळ 5 टक्के जीएसटी लागणार आहे.
शेतकऱ्यांच्या विविध वस्तू,
शेतीशी संबंधित वस्तू ज्यांच्यावर आधी 12 टक्के जीएसटी लागायचा तो आता 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. तसेच मार्बल, लेदर इत्यादी वस्तूंवरील देखील जीएसटी कमी करण्यात आला आहे.
सिमेंटवर याआधी 28 टक्के जीएसटी आकारला जायचा. पण आता 18 टक्के जीएसटी लावला जाईल.
आरोग्याशी संबंधित उपकरणे आणि 33 औषधांवर आता जीएसटी लागणार नाही.
चष्मा आणि व्हिजन संबंधित उपकरणांवर आता 5 टक्के जीएसटी लागेल.
हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्सवर लागणाऱ्या जीएसटीतही घट झाली आहे. बूट आणि कपड्यांवरच्या देखील जीएसटीत घट करण्यात आली आहे. या वस्तूंवरील जीएसटी 12 टक्क्यांवरुन आता केवळ 5 टक्क्यांवर करण्यात आली आहे.औषधे, ट्रॅक्टर, तूप, लोणी स्वस्त होणार आहे. त्यांच्यावर आधी 12 टक्के जीएसटी लागत होता. पण यापुढे आता 5 टक्के जीएसटी लागणार आहे.

लक्झरी वस्तू जसे की कार, बाईक आणखी महाग होतील. यावर एक विशेष स्लॅब लावला जाईल. याशिवाय तंबाखू, पान मसाला, फ्लेवर, फ्रूट ड्रिंक आणि इतर पॅकेज्ड पेये महाग होतील. 350 सीसी पेक्षा जास्त इंजिन असलेल्या बाईक महाग होतील