अकोला दिव्य न्यूज : नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेले महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अकडले असून, यात अकोला शहरातील पाच जणांचा समावेश असल्याची माहिती हाती आली आहे. इतर यात्रेकरूंसोबतच हे पांचजणही सुरक्षित आहेत. नेपाळच्या पोखरा येथून अडकून पडलेल्या जवळपास ४० यात्रेकरूसोबत अकोला शहरातील हे ५ जण आज गुरुवारी जनकपुरीसाठी रवाना झाले आहेत. अकोला जिल्ह्यातूनही काही यात्रेकरू बद्रीनाथ,केदारनाथ आणि पशुपतीनाथसाठी तर काही भाविक प्रयागराज येथून नेपाळ गेले. काहीजण ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून, तर काहीजण वैयक्तिरित्या गेले आहेत.

अकोला येथील रेडिमेड गारमेंटचे घाऊक विक्रेते आणि लेडिज अंडर गारमेंटच्या नामांकित कंपनीचे वितरक व श्री. गारमेंटचे संचालक कमल घनश्यामदास जाजू आणि त्यांचे भाऊ विजय जाजू हे आपल्या पत्नी व एक नातेवाईक मंगल करवा यांच्यासोबत बद्रीनाथ व केदारनाथला देवदर्शन करून झाल्यावर एका ट्रॅव्हल कंपनीद्वारे आयोजित पशूपतीनाथ दर्शन आणि पर्यटनासाठी नेपाळला गेले. मात्र हिंसाचारामुळे पोखरा येथे अडकून पडले. मात्र दोन दिवस हॉटेलमध्ये सुरक्षित होते. आज ट्रॅव्हल कंपनीने त्यांच्या परतीच्या प्रवासाची सोय करुन जनकपुरीसाठी रवाना केले
अकोला येथील त्यांच्या नातेवाईकांचा संपर्क झाला असून, अकोला येथून पुण्याला स्थाईक झालेल्या मंगल करवा यांचाही आपल्या नातेवाईकांशी संपर्क झाला. अकोला दिव्य सोबत संपर्क साधून करवा यांनी जाजू कुटुंबियांसह आपण आणि कोटा राजस्थान येथील काही भाविकासह नेपाळसाठी गेले होते. महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनाकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व ट्रॅव्हल्स कंपन्यांशी संपर्क साधण्यात आला असून, बेपत्ता नागरिकांच्या नातेवाईकांनीही बेपत्ता नागरिकांची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.