अकोला दिव्य न्यूज : नागपूर येथील राज्य विज्ञान शिक्षण संस्था , शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अकोला जिल्हा परिषद, अकोला जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ व प्रभात किड्स स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा व विज्ञान नाट्योत्सवाच्या जिल्हास्तरीय फेरी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. अरविंद मोहरे यांच्या मार्गदर्शनात वाशिम रोडवरील प्रभात किड्स येथे उत्साहात पार पडली.

या स्पर्धेत तालुक्यातून निवड झालेल्या नाट्यमध्ये 13 शाळांनी तर विद्यार्थी विज्ञान मेळावा मध्ये 16 शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. विद्यार्थी विज्ञान मेळाव्यामध्ये प्रभात किड्स स्कूलची गार्गी गरकल हिने प्रथम तर बालशिवाजी शाळेचा आयुष जळमकर याने द्वितीय क्रमांक प्राप्त करून विभागीय स्तरावरील मेळाव्यासाठी यांची निवड करण्यात आली.
विज्ञान नाट्योत्सवात प्रभात किड्स स्कूलच्या नया उजाला या विज्ञान नाट्याने प्रथम क्रमांक मिळवून विभागस्तरावर झेप घेतली. तसेच उत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषीक प्रभात किड्सचे प्रमोद गोलडे यांनी पटकाविले. सर्वोत्कृष्ठ स्क्रीफ्ट लेखन व्यंकटेश बालाजी शाळा मूर्तिजापूर तर अभिनय प्रथम मुलींमधून अ. जा. मुलींची शाळा बाळापूरची लुंबीनी सरदार व मुलांमधून प्रथम अर्णव ढोरे आर. डी. जी. पब्लिक स्कूल, अकोला यांना देण्यात आला. विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे परिक्षण अमरावती विद्यापीठाचे रसायनशास्त्र विभागाचे मा. विभाग प्रमुख डॉ. आनंद अस्वार, शासकीय विदर्भ विज्ञान आणि मानव्यविद्या संस्था (स्वायत्त ) अमरावतीचे डॉ. श्रीकृष्ण यावले व शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोलाचे डॉ. संजय देवळे यांनी केले. तसेच विज्ञान नाट्योत्सवासाठी विनय बोदडे, प्रमोद वानखडे व काजल राऊत यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी मंचावर जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक जिल्हा परिषद अकोलाचे प्रमोद टेकाडे, प्रभात किड्स संचालक मंडळ सदस्य अशोक ढेरे, ज्येष्ठ रंगकर्मी अरुण घाटोळे, जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रविंद्र भास्कर, प्रभातच्या उपप्राचार्य अर्चना बेलसरे, व्यवस्थापक अभिजीत जोशी, तालुका विज्ञान मंडळाचे ओ.रा. चक्रे, अनिल जोशी हे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.रविंद्र भास्कर यांनी केले. सुत्रसंचालन आशा भास्कर तर आभार प्रभातचे सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे यांनी मानले.